अधिकाऱ्यांना विचारलं तर ते सांगतात आम्हाला माहीत नाही, वरून ऑर्डर आलेली आहे.
रत्नागिरी - गणेशोत्सव जवळ येत आहे. यादरम्यान अनेकांची गावी जाण्यासाठी लगबग सुरु झाली आहे. गेले दोन वर्ष कोरोनामुळे (Covid-19) कोकणासह सर्वत्र साध्यापद्धतीने गणेशोत्सव साजरा झाला. मात्र ऐन सणाच्या पार्श्वभूमीवर राज्यसरकारने रत्नागिरी (Ratnagiri News) जिल्ह्यातील 24 कोविड सेंटर बंद केली आहेत. लाखो रुपये खर्च करुन उभा केलेली सेंटर का बंद केलीत असा सवाल विरोधकांकडून विचारला जात आहेत. दरम्यान भाजपच्या निलेश राणे (Nilesh Rane) यांनी ठाकरे सरकराला ट्वीटद्वारे निशाना साधला आहे. (Political news)
ते म्हणतात, रत्नागिरी जिल्ह्यातील 24 कोविड सेंटर बंद केली आहेत. सेंटरमधील कर्मचाऱ्यांना अचानकपणे काढण्यात आलंय. लांजातील एका कोविड सेंटरला रात्री बारा वाजता कुलुप लावलं. गणेशोत्सवच्या पार्श्वभूमीवर आता कोकणात हजारो लोक येणार आहेत. यामुळे कोरोनाचे सावट असताना, तिसऱ्या लाटेची भीती असताना अशा परिस्थितीत रत्नागिरी जिल्ह्यातील 24 कॉल सेंटर बंद करण्याचं कारण काय ? असा सवाल त्यांनी केला आहे. पुढे ते म्हणाले, अधिकाऱ्यांना विचारलं तर ते सांगतात आम्हाला माहीत नाही, वरून ऑर्डर आलेली आहे. ठाकरे सरकार (Thackeray Government) ) रत्नागिरीच्या लोकांना मारुन टाकण्याचा सरकारचा विचार आहे का? असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.
दरम्यान निलेश राणे यांनी ठाकरे सरकारला कोविड सेंटर उघडावी लागतील आणि यासाठी भाजपा आंदोलन करणार असल्याचेही सांगितले आहे. नोकरीवरुन कमी केलेल्या लोकांना त्याच ठिकाणी परत नोकरीवर हजर करुन घ्यावे लागेल, असेही त्यांनी सूचित केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.