Nilima Chavan Case : नीलिमाचा संशयास्पद मृत्यू; महाराष्ट्रातील 'सलून' राहणार बंद, न्यायासाठी नाभिक समाज आक्रमक

'निलिमा चव्हाणच्या घातपाताच्या दृष्टीने तपास करून तिच्या कुटुंबीयांना न्याय मिळवून द्यावा'
Nilima Chavan murder case
Nilima Chavan murder caseesakal
Updated on
Summary

नीलिमा चव्हाण मृत्यूप्रकरणी पोलीस आजही जगबुडी नदी परिसरात चार बोटी आणि ड्रोन कॅमेराच्या सहाय्याने तिची बॅग व मोबाइलचा शोध घेत आहेत. 

खेड : चिपळूण तालुक्यातील ओमळी येथील निलिमा सुधाकर चव्हाण हिच्या संशयास्पद मृत्यूची कसून चौकशी करून आरोपीवर कठोर कारवाई करण्याच्या मागणीसाठी तालुका नाभिक समाजाने (Nabhik Samaj) येथील तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढला.

या घृणास्पद प्रकाराचा योग्य तपास न झाल्यास जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील सलून व्यवसाय (Salon in Maharashtra) बंद ठेवून आंदोलन छेडण्यात येईल, असा गर्भित इशाराही देण्यात आला आहे. निलिमा चव्हाण ही दापोली येथील बँकेच्या शाखेतून काम आटपून घरी येण्यास निघाली असता तिथून बेपत्ता होती. तिचा मृतदेह दाभोळखाडी येथे मिळाला.

Nilima Chavan murder case
Nanded Crime : विषारी औषध प्राशन करून शेतमजूर दाम्पत्यानं उचललं टोकाचं पाऊल; पत्नीचा मृत्यू, पतीवर उपचार सुरू

निलिमा चव्हाण ही उच्चशिक्षित व सद्वर्तनी होती. मृतदेह ज्या स्थितीत आढळला त्यावरून मृतदेहाची ओळख पटवू नये, या दृष्टीने केलेली छेडछाड आहे, असे ठाम मत आहे. तिच्यावर कोणत्यातरी अज्ञात व्यक्ती किंवा व्यक्तींच्या समूहाने पाळत ठेवून मृतदेह पाण्यात फेकला असावा, असा संशय आहे.

Nilima Chavan murder case
NCP Crisis : 15 ऑगस्टनंतर राज्यात पुन्हा राजकीय भूकंप! राष्ट्रवादीचा मोठा गट अजितदादांसोबत जाणार? जयंत पाटलांचंही नाव चर्चेत

त्या दृष्टीने त्याचा वरिष्ठ यंत्रणामार्फत कसून तपास होणे आवश्यक आहे. निलिमा चव्हाणच्या घातपाताच्यादृष्टीने तपास करून तिच्या कुटुंबीयांना न्याय मिळवून द्यावा, अशी आग्रही मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. या घृणास्पद प्रकाराचा जाहीर निषेध करत असून योग्य तपास न झाल्यास जिल्ह्यासह महाराष्ट्रातील सलून व्यवसाय बंद ठेवून आंदोलन छेडण्यात येईल व त्याची संपूर्ण जबाबदारी प्रशासनाची राहील, असेही निवेदनात नमूद केलं आहे.

Nilima Chavan murder case
Maratha Reservation : आता आरपारची लढाई! आरक्षण न मिळाल्यास मतदानावर टाकणार बहिष्कार; मराठा समाजाचा थेट इशारा

या प्रसंगी तालुका नाभिक समाजाचे अध्यक्ष श्यामसुंदर दळवी, उपाध्यक्ष ज्ञानेश्वर शिंदे, सचिव रामदास पवार, अमर दळवी, विक्रांत पवार, सचिन चव्हाण, अजय माने, अमोल दळवी, प्रशांत दळवी यांच्यासह पदाधिकारी व सदस्य तसेच महिला बहुसंख्येने सहभागी झाल्या होत्या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()