सुखद : एकाच कुटुंबातील नऊ जणांनी घेतला नेत्रदानाचा संकल्प...

Nine members of the same family decided to donate their eyes
Nine members of the same family decided to donate their eyes
Updated on

खेड (रत्नागिरी) : शहरातील कुंभार आळीतील एकाच कुटुंबातील नऊ जणांनी जागतिक नेत्रदिनी नेत्रदानाचा संकल्प केला आहे. खेडेकर कुटुंबातील 9 सदस्यांनी नेत्रदान संकल्प अर्ज भरून नेत्र तज्ञ डॉ. मरकड यांच्यामार्फत सरकारकडे सुपूर्द केले. 


अमेय राकेश खेडेकर, ऋतुराज राकेश खेडेकर, महेंद्र गणपत खेडेकर, मीनल महेंद्र खेडेकर, श्रद्धा महेंद्र खेडेकर, सानिका संतोष खेडेकर, ऋतुजा संतोष खेडेकर, भूमी संतोष खेडेकर, समीर अनिल खेडेकर अशी नेत्रदान संकल्प करणार्‍यांची नावे आहेत.


नेत्रदान हे सर्वश्रेष्ठ दान मानले जाते. नेत्रदान हे श्रेष्ठदान ही संकल्पना खेडेकर कुटूंबीयांनी समाजाला समजवण्याआधी स्वतःच्या घरातून नेत्रदानाची सुरवात केली. जागतिक नेत्रदान दिनी त्यांच्या कुटुंबातील नऊ जणांनी नेत्रदानाचा संकल्प केला आहे. एकाच कुटुंबातील नऊ जणांनी  हा संकल्प केल्याने कुंभार समाजात नव्हे तर संपूर्ण बहुजन समाजात एक आदर्श निर्माण केला आहे. त्यामुळे सर्वच स्तरांतून या कुटुंबीयांचे कौतुक होत आहे. भविष्यात यापुढे खेडेकर कुटुंबीय नेत्रदानासाठी समाजात प्रबोधन करेल अशी प्रतिक्रिया खेडेकर कुटुंबीयांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.