'जे दिशा बरोबर झाले..तेच पुजा बरोबर होणार असेल..तर तो'

nitesh rane criticized on the law of shakti on state government in sindhudurg
nitesh rane criticized on the law of shakti on state government in sindhudurg
Updated on

सावंतवाडी (सिंधुदुर्ग) : पुजा चव्हाण या प्रकरणावरुन सध्या गदारोळ माजला आहे. तिच्या आत्महत्येवरुन पुन्हा एकदा अनेक वाद समोर येत आहेत. याबाबत जे दिशा बरोबर झाले..तेच पुजा बरोबर होणार असेल..तर तो "शक्ती" कायदा.. काय चाटायचा आम्ही? असे म्हणत आमदार नितेश राणे यांनी दोन दिवसांपूर्वी ट्वीट करत शक्ती कायदा आणि सरकारवर निशाना साधला.

दरम्यान शनिवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पूजा चव्हाण आत्महत्येप्रकरणी सखोल चौकशी केली जाईल, मात्र यानिमित्ताने कोणाला आयुष्यातून उठण्याचा प्रकार होता कामा नये अशी प्रतिक्रिया यावेळी माध्यमांना दिली. 

 
काय आहे शक्ती कायदा - महाराष्ट्र सरकारने शक्ती विधेयक-२०२० हे महिला व बाल लैंगिक अत्याचारविरोधी विधेयक केले आहे. राज्यात महिला व बालकांवर लैंगिक अत्याचाराचे प्रमाण वाढले आहे. कठोर शिक्षेचे कायदे नसल्यामुळे अत्याचार वाढल्याचा आरोप करण्यात आल्यानंतर राज्य सरकारने आंध्र प्रदेशातील 'दिशा' या कायद्याच्या धर्तीवर शक्ती विधेयक आणले आहे. फाशीच्या शिक्षेवर अनेक देशात बंदी आहे. त्यासोबत या शिक्षेमुळे पुरावे नष्ट करण्याच्या हेतूने पीडितेचा खून होण्याची शक्यता आहे. हाथरस येथील महिला अत्याचार प्रकरणात पुरावे नष्ट करण्याच्या हेतूने पीडितेची हत्या करण्यात आली आणि नंतर तिला जाळून टाकण्यात आले होते. 

संपादन - स्नेहल कदम

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.