न्यायालयाचा न्याय विकत घेता आला नाही म्हणून नितेश राणे कोठडीत, सावंतांचा आरोप

कणकवली विधानसभा मतदारसंघात विकासाचा नारळ फुटतच नाही. येते रक्ताचा नारळ फुटतो. रक्त सांडल्या शिवाय त्यांना निवडणुका जिंकता येत नाही.
Nitesh Rane
Nitesh RaneSakal
Updated on
Summary

कणकवली विधानसभा मतदारसंघात विकासाचा नारळ फुटतच नाही. येते रक्ताचा नारळ फुटतो. रक्त सांडल्या शिवाय त्यांना निवडणुका जिंकता येत नाही.

कणकवली - कणकवली विधानसभा (Kankavali Assembly) मतदारसंघात विकासाचा (Development) नारळ फुटतच नाही. येते रक्ताचा नारळ फुटतो. रक्त सांडल्या शिवाय त्यांना निवडणुका (Election) जिंकता येत नाही. ही दहशतवादी प्रवृत्ती संपवून शाश्वत विकासाला चालना मिळावी यासाठी आता मतदारसंघातील लोकांनी विचार करावा असा सल्ला देत शिवसेना नेते तथा जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष सतीश सावंत (Satish Sawant) यांनी मुर्ती लहान आणि अपकिर्ती महान असलेल्या नितेश राणेंना (Nitesh Rane) जनतेने ओळखले आहे. न्यायालयाच्या न्याय त्या विकत घेता न आल्याने त्यांना पोलिस कोठडीत (Police Custody) जावे लागाले असा आरोपही सतीश सावंत यांनी आज येथे पत्रकार परिषदेतून केले आहे.

न्यायालयाचे दरवाजे ठोठावून ही पैशाने न्याय विकत घेता आला नाही. पोलिसांनी योग्य तपास करून भाजपचे आमदार नितेश राणे यांना दोन दिवसाची पोलीस कोठडी दिली. त्यामुळे सुपारी बाज आमदार हे निश्चित झाले. संतोष परब यांच्या राहिल्या करण्यासाठी किती लाख रुपये दिले होते ते ही समजले पाहिजे आणि आत्तापर्यंत राणेंवर दहशतवादाचा आरोप करणारे भाजपचे नेते या घटनेचा का निषेध करत नाहीत असा सवाल सतीश सावंत यांनी येथे केला आहे. शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयात बोलताना श्री. सावंत यांनी संतोष परब हल्ल्यातील घटनाक्रम नमूद केले.

Nitesh Rane
पोलिसांची भाजपविरोधात दडपशाही सुरुये; राजन तेलींचा हल्लाबोल

आपण पैशाने सर्व काही जिंकू, कारण रक्त सांडल्या याशिवाय त्यांना विजय मिळवता येत नाही. ही त्यांची विजयाची परंपरा आहे आणि ती परंपरा त्यांनी स्वयंभूच्या भूमीत संतोष परब यांच्यावर हल्ला करुन जिल्हा बँक आपल्या ताब्यात घेण्यासाठी यश मिळवले. भाजपचे सगळे नेते सरकारने सूडबुद्धीने कारवाई केली असे सांगत, न्याय देवतेवर आपला विश्वास आहे असे म्हणत होते. आता त्याच न्यायदेवतेने नितेश राणे हे आरोपी असल्याचे सिद्ध केले आहे. आता तरी भाजपची मंडळी ते मान्य करतील का, जुन्या भाजपच्या मंडळींनी तरी संतोष परब यांच्या हल्ल्याबाबत निषेध आतातरी व्यक्त करावा.

जिल्हा बँकेमध्ये माजी जिरवली म्हणणाऱ्या नितेश राणे यांची कधी जिरली हे त्यांनाच कळले नाही. नितेश राणे यांच्यावर सूडबुद्धीने कारवाई केल्याचा आरोप म्हणत असतील तर पोलिसांच्या तपासामध्ये सचिन सातपुते यांनी त्यांचे नाव पुढे केले. गेल्या २८ ऑगस्टला नितेश राणे यांनी आपल्या मोबाईल वरून संतोष परब यांचा फोटो सचिन सातपुतेला पाठवला होता. असे न्यायालयातील युक्तीवादातून सिद्ध झाली आहे. त्यामुळे या कटामध्ये नितेश राणे होते हे सिद्ध होते. शिवसेना अशा दहशतवादाला भीक घालणार नाही. जिल्ह्यात आजवर ज्यांच्या गाड्या जाळल्या गेल्या, मारामारी केली गेली, कार्यकर्त्यांवर हल्ले झाले अशी मंडळी आज निश्चितच खुश असतील असे सावंत म्हणाले,

काळी जादू करून किंवा पैसे देऊन न्याय व्यवस्था विकत घेतली जात नाही. आज जिल्ह्याच्या इतर विधानसभा मतदारसंघात दररोज विकासाबाबतच्या बातम्या येत आहेत. मात्र, कणकवली मतदारसंघात खून, मारामाऱ्या, हल्ले याच बातम्या येत आहेत. त्यामुळे या विधानसभा मतदारसंघातून ही प्रवृत्ती कायमची नष्ट करण्यासाठी यापुढे मतदार नक्कीच पुढे येतील असा विश्‍वासही त्यांनी व्यक्त केला आहे. रक्त सांडल्याशीवाय विजय मिळत नाही. ही प्रवृत्ती भविष्यात या मतदारसंघातून नष्ट होईल.

पुढच्या निवडणुकीमध्ये कुणाचाही संतोष परब होऊ नये अशी सुदबुध्दी नितेश राणे यांना ग्रामदैवतांनी द्यावी असेही त्यांनी नमूद केले आहे. जिल्हा न्यायालयापासून उच्च न्यायालयापर्यंत धाव घेणाऱ्या नितेश राणे यांची घमेंड आता तरी उतरली असेल, त्यांना या मतदार संघातील विकास कामांसाठी जनतेने निवडून दिले होते. मात्र, त्यांनी जनतेची फसवणूक केली. यापुढे अशी राडेबाजी या मतदारसंघात चालणार नाही. या मतदारसंघांला आप्पासाहेब गोगटे, केशवराव राणे, अजित गोगटे या मंडळींचा वारसा आहे. हा वारसा या राडेबाज आणि सुपारी बाज आमदारांमुळे नष्ट झाला असल्याचा थेट आरोप सतीश सावंत यांनी केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.