Nitesh Rane : भाजपसोबत युतीसाठी ठाकरेंच्या पायघड्या - आमदार नीतेश राणे

राणे : देशातील जनतेचा मोदींवरच विश्‍वास
nitesh rane says uddhav thackeray please to alliance with bjp politics
nitesh rane says uddhav thackeray please to alliance with bjp politicsSakal
Updated on

कणकवली : देशभरात जनतेने पंतप्रधान नरेंद्र मोदींवरच विश्‍वास कायम ठेवला आहे. त्‍यामुळेच तीन राज्‍यांच्या विधानसभा निवडणूक निकालात भाजपने पूर्णतः बहुमत मिळविले आहे. या यशानंतर आता उबाठा गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजप सोबत युती करण्यासाठी पायघड्या घालणे सुरू केले आहे, अशी टीका आमदार नीतेश राणे यांनी आज येथे केली.

येथील प्रहार भवन येथे श्री. राणे यांनी पत्रकार परिषद घेतली. ते म्‍हणाले, चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत भाजपने जोरदार मुसंडी मारली आहे. एक्झिट पोलचे दावे साफ खोटे ठरवत तीन राज्यांमध्ये भाजपचा दणदणीत विजय झाला आहे.

यावरुन विरोधकांकडून सतत टीका केली जात आहे. पण त्‍यांनी कितीही टीका केली तरी देशात मोदींची गॅरंटी चालते हे जनतेने दाखवून दिले आहे.

nitesh rane says uddhav thackeray please to alliance with bjp politics
Kankavli News:'ती' बातमी छापणाऱ्या पत्रकाराला जीवे मारण्याची धमकी; डॉक्टरविरोधात गुन्हा दाखल

ते म्‍हणाले, भाजपला देशभरात मिळत असलेला उदंड प्रतिसाद पाहता उद्धव ठाकरे हे भाजपसोबत युती करण्यासाठी धडपडत आहेत. त्‍यांनी भाजपच्या नेत्यांजवळ पायघड्या घालणे सुरू केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.