काही वेळात पोलिस निरीक्षक यादव आपल्या दालनात आले. त्यांनी कार्यकर्त्यांची समजूत काढली. ही माहिती मिळताच आमदार राणे यांनी कणकवली पोलिस ठाण्यात धाव घेतली.
कणकवली : तालुक्यात एका अल्पसंख्यांक समाजातील युवतीने पाकिस्तानचे (Pakistan) समर्थन करणारा आणि हिंदू देवतांबाबत (Hindu Gods) आक्षेपार्ह मजकूर सोशल माध्यमावर व्हायरल केल्याने भाजप कार्यकर्ते आक्रमक झाले. त्यांनी थेट कणकवली पोलिस ठाणे गाठत कारवाईची मागणी केली.
यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला. त्यानंतर आमदार नीतेश राणे (Nitesh Rane) यांनी पोलिस निरीक्षक अमीत यादव यांची भेट घेऊन संबंधितांवर कारवाई करावी, अशा सूचना केल्या. त्यानंतर या वादावर पडदा पडला. एका युवतीने १४ ऑगस्टला सोशल मीडियावर वादग्रस्त व्हिडिओ प्रसिद्ध केला होता. काही दिवसांपासून तो व्हायरल होत असल्याने हे प्रकरण धुमसत होते.
त्याचा उद्रेक आज झाला. यामुळे दोन समाजामध्ये तेढ निर्माण होऊन सामाजिक सलोखा बिघडण्याची शक्यता असून संबंधित युवतीवर आणि त्या कुटुंबावर कारवाई करा, अशा मागणीचे निवेदन घेऊन भाजपचे कणकवली तालुका अध्यक्ष मिलिंद मेस्त्री घेऊन कार्यकर्त्यांसह कणकवली पोलिस ठाण्यात गेले.
यावेळी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संदेश उफ गोट्या सावंत, जिल्हा बँकेच्या संचालिका प्रज्ञा ढवण, बँकेचे संचालक समीर सावंत, कलमठ सरपंच मिलिंद मेस्त्री, स्वप्नील चिंदरकर, अण्णा कोदे, सोशल मीडिया प्रमुख समीर प्रभुगावकर, शिशिर परुळेकर आदी उपस्थित होते. सायंकाळी सहाच्या सुमारास येथील पोलिस ठाण्यात भाजप कार्यकर्ते दाखल झाले.
यावेळी पोलिस निरीक्षक यादव हे व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये होते. पोलिसांनी या कार्यकर्त्यांना रोखले. पोलिस निरीक्षक कार्यालयात येत नाहीत, तोपर्यंत आपण जाऊ नका अशा सूचना केल्या; मात्र कार्यकर्ते पोलिस निरीक्षकांच्या कार्यालयात घुसले. त्यांना बाहेर जाण्याची सूचना महिला पोलिस उपनिरीक्षक वृषाली बर्गे यांनी केली. यावेळी संदेश उर्फ गोट्या सावंत आणि बर्गे यांच्यात वाद झाला.
दरम्यान, काही वेळात पोलिस निरीक्षक यादव आपल्या दालनात आले. त्यांनी कार्यकर्त्यांची समजूत काढली. ही माहिती मिळताच आमदार राणे यांनी कणकवली पोलिस ठाण्यात धाव घेतली. संबंधित युवतीवर कारवाई करावी, तसेच यामागे इतर कोणी आहे, का हे पहावे, अशी मागणी केली. यावर पोलिस निरीक्षक श्री. यादव यांनी संबंधितांची माहिती घेऊन तशा नोटिसा दिल्या जातील असे सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.