ऑलिव्ह रिडले कासवांच्या संरक्षणासाठी सरसावले हे हात......

Olive Ridley Turtle Undertake turtle conservation work in ratnagiri
Olive Ridley Turtle Undertake turtle conservation work in ratnagiri
Updated on

पावस ( रत्नागिरी) : समुद्रात सापडणाऱ्या ऑलिव्ह रिडले या जातीच्या कासवांचे संरक्षण करण्यासाठी रत्नागिरी तालुक्यातील गावखडी समुद्रकिनाऱ्यावर रत्नागिरीतील निसर्ग यात्री संस्था वनविभाग आणि प्राणीमित्र यांच्या सहकार्याने कासवांचे संवर्धनाचे काम हाती घेतले आहे दिनांक 21 एप्रिल 2020 रोजी रात्री सात वाजून 45 मिनिटांनी सहाव्या घरट्यातील 94 कासवांची पिल्ले समुद्रात सोडण्यात आली

 समुद्र कासवाच्या संवर्धनासाठी दोन वर्षापूर्वी  निसर्ग यात्री संस्थेची स्थापना करण्यात आली ही संस्था वनविभागाच्या मार्गदर्शनाखाली गावखडी ग्रामपंचायतीच्या सहकार्याने कासव संवर्धनाचे काम हाती घेतले आहे येथील प्राणीमित्र श्री प्रदीप डिंगणकर राकेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही संस्था गावखडी परिसरात तन्मयतेने काम करते या दोघा प्राणी मित्रांनी गावखडी परिसरात संवर्धनासाठी गस्ती चे काम हाती घेतली आहे. त्यामुळेच या परिसरात कासव संवर्धनाचे काम चांगल्या प्रकारे होत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.

कासवांच्या तस्करीचे प्रमाण वाढल्यामुळे ही जात नष्ट होण्याच्या मार्गावर आहे समुद्रकिनारी होणाऱ्या मासेमारीमुळे या पिल्लांचा बळी जातो त्यासाठी अंडी घालणाऱ्या कासवांच्या संरक्षणासाठी ही संस्था काम करते अंडी घातलेल्या ठिकाणावर पाळत ठेवून त्याच्या संरक्षणाची जबाबदारी हे दोघे  प्राणी मित्र पार पडत असतात त्यामुळेच  या किनाऱ्यावर अंड्याची घरटी वेळोवेळी गस्ती मुळे वारंवार सापडतात आणि त्याचे समुद्राच्या पाण्यात सोडण्याचे काम चांगल्या प्रकारे होते.

 निसर्ग यात्री संस्थेचे गावखडी येथील कार्यकर्ते श्री प्रदीप डिंगणकर व राकेश पाटील यांना 2 नोव्हेंबर 2019 रोजी गावखडी किनाऱ्यावर कासवांच्या अंड्याची घरे आढळून आले परंतु त्यादरम्यान खूप पाऊस असल्याने त्याठिकाणी व्यवस्थित पोहोचता आले नाही परंतु महिन्यानंतर एका घरट्यातील 118 पिल्लांना समुद्रात सोडण्यात आले त्यापूर्वी पहाटेच्या सुमारास त्यांचा समुद्राकडे जाण्याचा प्रवास दिसू लागल्यानंतर त्या घरट्यातील पिल्लांना व्यवस्थित रित्या बाहेर काढून मार्गस्थ करण्यात आले ऑलिव्ह रिडले या पिलांचा कालचा प्रवास खऱ्या अर्थाने सुखकर झाल्याचे चित्र पाहावयास मिळत होते. कारण गेले महिनाभर लॉक डाऊन असल्याने मच्छीमारीवर बंदी असल्याने मच्छीमारांच्या बोटी किनारा पकडल्यामुळे त्यांच्या जाळीचा प्रादुर्भाव आढळलेला नाही.

त्या कारणानेच त्यांचा घरट्या कडून समुद्राकडे जाण्याचा मार्ग खऱ्या अर्थाने पहिल्यांदाच सुखकर झाल्याचे चित्र स्पष्ट झाले होते. कारण एरवी त्यांच्या मार्गात अनेक अडथळे येत असतात पर्यटक मासेमार इत्यादी लोक संचारबंदी मुळे समुद्राकडे फिरकण्याची प्रमाण अत्यल्प होते. यावेळी  गावखडी  समुद्र  कासव संवर्धन केंद्र  विभागीयवनाधिकारी  श्री  भवर  परिक्षेत्र  वनाधिकारी  सौ  प्रियांका  लगट  रत्नागिरीचे  वनरक्षक  सौ  मिताली कुबल  यांच्या मार्गदर्शनाखाली कासव संवर्धनाचे काम करण्यात आले.

याबाबत प्राणीमित्र श्री प्रदीप डिंगणकर म्हणाले की या समुद्रकिनारी एकूण 14 घरटी अस्तित्वात आहे त्यातील सहा घरट्यातून  खेपेस 488 पिल्ले समुद्रात सोडण्यात आली उर्वरित आठ घरटी टप्प्याटप्प्याने समुद्राकडे धाव घेतील त्यासाठी आम्ही दोघे जण जातीनिशी लक्ष ठेवून आहोत जेणेकरून त्यांच्यावर इतर कोणाचा प्रभाव पडणार नाही आणि आपल्या नेहमीच्या शैलीने घरट्यातून समुद्रामध्ये जाऊन आपल्या जातीचे अस्तित्व वाढवतील आणि आम्ही केलेल्या कष्टाचे चीज होईल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.