Ratnagiri : पोचरीच्या सुपुत्राचा NASA मध्ये डंका; ओंकार धामणेनं केलं संधीचं सोनं, शोधनिबंध आंतरराष्ट्रीय परिषदेत सादर

भारतातून काही निवडकच शोधनिबंधांची या परिषदेत निवड करण्यात आली.
America NASA Mumbai University Omkar Dhamane
America NASA Mumbai University Omkar Dhamaneesakal
Updated on
Summary

भौतिकशास्त्रात पीएचडी करणारा ओंकार हा अतिशय दुर्गम खेडेगाव पोचरी धामणेवाडी येथील आहे.

रत्नागिरी : नासा (NASA) लिव्हिंग विथ स्टार आणि युनिव्हर्सिटी कॉर्पोरेशन ऑफ अॅटमॉस्फेरिक रिसर्च यांच्या संयुक्त विद्यमाने अमेरिकेतील गोल्डन कोलोरॅडो येथील आंतरराष्ट्रीय परिषदेत पोचरी गावचा (ता. संगमेश्वर) सुपुत्र ओंकार धामणे (Omkar Dhamane) याने शोधनिबंध सादर केला.

आयसीएमईचा अभ्यास करून त्याचा मानवी जीवनावर होणारा परिणाम कसा टाळला जाऊ शकतो, याबद्दल ओंकारचा अभ्यास सुरू आहे. भारतातून काही निवडकच शोधनिबंधांची या परिषदेत निवड करण्यात आली. त्यात ओंकारला संधी मिळाली. त्याचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.

America NASA Mumbai University Omkar Dhamane
आम्हाला कुणबी-मराठा प्रमाणपत्र नको; कोकणातील मराठा समाजानं घेतली वेगळी भूमिका; जरांगेंच्या 'या' निर्णयाला केला विरोध

अंतराळ आणि वातावरण या विषयावर आधारित चौथ्या एडी नासा सिम्पोजियम या आंतरराष्ट्रीय संशोधन परिषदेमध्ये ओंकारने शोधनिबंध सादर केला. मुंबई विद्यापिठातील (Mumbai University) भौतिकशास्त्र विभागाचा ओंकार विद्यार्थी आहे. भौतिकशास्त्रात पीएचडी करणारा ओंकार हा अतिशय दुर्गम खेडेगाव पोचरी धामणेवाडी येथील आहे.

America NASA Mumbai University Omkar Dhamane
Maratha Reservation : कुणबीच्या 20 हजार नोंदी शिंदे समितीला सापडण्याची शक्यता; 15 ते 20 लाख लोकांना होणार फायदा

शालेय शिक्षण रत्नागिरीतून पूर्ण केल्यावर तो स्पेस अॅंड प्लाझ्मा फिजिक्स या भौतिकशास्त्रातील अत्यंत अवघड समजल्या जाणाऱ्या विषयात संशोधन करत आहे. त्याचा संशोधनाचा विषय टर्बोव्हेंट आणि इंटरप्लॅनेटरी स्पेसच्या चुंबकीय क्षेत्रांमध्ये अल्फेन लहरींचा उत्पत्तीचा प्रसार आणि विघटन हा आहे. या द्वारे आयसीएमईचा अभ्यास करून त्याचा मानवी जीवनावर होणारा परिणाम कसा टाळला जाऊ शकतो याबद्दल ओंकारचा अभ्यास सुरू आहे.

नेट, सेट, गेट तसेच टाटा मूलभूत शिक्षणसंस्था (टीआयएफआर) व भाभा अणुसंशोधन केंद्राची (बीएआरसी) पीएचडी प्रवेश परीक्षा उत्तीर्ण झालेल्या ओंकारने आजवर ८ शोधनिबंध आंतरराष्ट्रीय दर्जाच्या वैज्ञानिक शोधनिबंध प्रसिद्ध करणाऱ्या नियतकालिकेत प्रकाशित केले आहेत. यातीलच आयसीएमई चुंबकीय ढगांमध्ये १ एयूवर अल्फेन आयन सायक्लोट्रॉन लहरींचे निरीक्षण हा शोधनिबंध ओंकारने नासा येथील परिषदेत काल (ता. ३१) सादर केला.

America NASA Mumbai University Omkar Dhamane
Government Schools : आता राज्यातील सर्व सरकारी शाळांना मिळणार मोफत वीज, पिण्याचं पाणी; मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

या प्रवासात ओंकारला त्याचे मार्गदर्शक प्रा. अनिल राघव, डॉ. अंकुश भास्कर यांचे उत्तम मार्गदर्शन व साथ मिळाली. कोकणातील ग्रामीण भागातल्या फारशा सुविधा नाहीत; परंतु त्यावर हुशारीने मात करत ओंकार मूलभूत संशोधनात प्रगल्भतेने काम करत आहे.

भौतिकशास्त्र आणि मूलभूत संशोधन सामान्य लोकांपर्यंत साध्या व सरळ भाषेत पोहोचवण्याचे माझे उद्दिष्ट आहे. नेट, सेट पूर्ण झाले. आता पीएचडीचे स्वप्नही पूर्ण होईल.

-ओंकार धामणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.