मुंबईची नोकरी सोडून इंजिनीअर बनवतोय बांबूपासून शोभेच्या वस्तू!

one person in konkan prepare bamboo commodities in ratnagiri
one person in konkan prepare bamboo commodities in ratnagiri
Updated on

देवरूख (रत्नागिरी) : कला ही केवळ शिकून साध्य करण्याची विद्या नाही. यासाठी मुळातच अंगभूत कला असावी लागते आणि बोटं तशी वळावी लागतात. बालपणापासून असलेली कला भविष्यात त्याने भिन्न पद्धतीचे शिक्षण घेतले तरी मोठेपणी त्याला स्वस्थ बसू देत नाही. याचे उदाहरण म्हणजे देवरूख येथील अभियंता असलेले अभिजित गानू. मुंबईतील नोकरी सोडून गावी परतले आणि बांबूपासून विविध आकर्षक आकार तयार करण्याची कला जोपासली. छंदाबरोबरच बांबूच्या वस्तूंमधून अर्थार्जनही होऊ लागले. 

अभिजित गानू यांचे मूळ गाव संगमेश्वर तालुक्‍यातील देवरूख. बालपणापासूनच त्यांना चित्रकलेची आवड होती. कलेची आवड असली तरी कला महाविद्यालयात जाऊन शिक्षण घेणे अभिजित यांना शक्‍य झाले नाही. अभिजित अभियांत्रिकी क्षेत्राकडे वळले आणि पदवी प्राप्त करून मुंबईत नोकरीला लागले. मात्र, हातातील कला स्वस्थ बसू देत नव्हती. अखेरीस नोकरी सोडून देवरुखात स्थायिक होण्याचा निर्णय घेतला. शाळेत असताना काष्ठशिल्प प्रकाराचे अभिजित यांना आकर्षण होते.

कलाक्षेत्रातच काहीतरी वेगळं करायचे म्हणून अभिजित यांनी बांबूमध्ये काही कलाकुसरीच्या वस्तू तयार करता येतील का? यावर अभ्यास सुरू केला. कोकणात बांबू मुबलक प्रमाणात असूनही याचा उपयोग बांबू तोडून तो मुंबईत विक्रीसाठी पाठविला जातो. ‘माणा’ जातीच्या बांबूपासून परड्या, हारे, सुपं, रोवळ्या बनवल्या जातात. याच बांबूपासून जर शोभिवंत वस्तू तयार केल्या तर कलेतील आवड जोपासली जाईल आणि अर्थार्जनही होईल, असा विचार करून विविध वस्तू बनवल्या. कोकणच्या बांबूला अभिजात दर्जा मिळवून देण्याचा आपला यातून नक्की प्रयत्न राहील, असे अभिजित यांनी अभिमानाने सांगितले. 

पेन स्टॅंड, दिव्याची शेड, चेंडूचे तोरणही

अभिजित यांनी बांबूपासून घड्याळाचा पेन स्टॅंड, दिव्याची शेड, चेंडूचे तोरण, आकाशकंदील तोरण बनवली. यात रात्री रंगीत दिवा लावल्यानंतर या सर्व वस्तू आकर्षक दिसू लागल्या आहेत. 

वस्तू भेट देण्यास उपयुक्त

गानू यांनी बांबूच्या या पर्यावरणपूरक शोभिवंत वस्तू मोठ्या प्रमाणावर तयार करायला सुरवात केली असून, वाढदिवस, साखरपुडा, घरभरणी, वास्तुशांती आदी प्रसंगी या वस्तू भेट देण्यास उपयुक्त असल्याने मागणी वाढल्याचे अभिजित यांनी सांगितले.

"पर्यावरणपूरक असणाऱ्या या बांबूच्या वस्तू आकर्षक, सुंदर आणि कलाकाराचे कौशल्य दाखविणाऱ्या आहेत."

- दिलीप म्हैसकर, काष्ठ शिल्पकार, बुरंबी

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.