Raigad News : ऑनलाईन मोबाईल रिचार्ज ग्राहकांना सोईचे पण वितरक, विक्रेत्यांच्या व्यवसायाचं काय ?

दळणवळण क्षेत्रातील मोठ्या क्रांतीमुळे मोबाईल, इंटरनेट यांनी जागतिक क्षेत्र व्यापलेले आहे. तंत्रज्ञानामुळे अनेक रोजगार उपलब्ध झाले असतानाच काही जणांना मात्र आपले काम गमावावे लागले आहे.
unemployment
unemploymentsakal
Updated on

Mahad News : ऑनलाईन मोबाईल रिचार्ज ग्राहकांना सोईचे आणि सवलतीचे पडत आहे. मात्र, दुसरीकडे रिचार्ज वितरक व विक्रेते; तसेच वितरकांकडे काम करणाऱ्या कामगारांवर त्याचा परिणाम झाला आहे.

रायगड जिल्ह्यात विक्रेते व वितरकांचा व्यवसाय कोलमडला आहे. तर अनेक जण बेरोजगार झाल्याची स्थिती आहे. सद्यस्थितीत दुकानात होणारा रिचार्ज व्यवसाय जवळपास संपुष्टात आला आहे.

दळणवळण क्षेत्रातील मोठ्या क्रांतीमुळे मोबाईल, इंटरनेट यांनी जागतिक क्षेत्र व्यापलेले आहे. तंत्रज्ञानामुळे अनेक रोजगार उपलब्ध झाले असतानाच काही जणांना मात्र आपले काम गमावावे लागले आहे. असाच प्रकार मोबाईल रिचार्ज व्यवसायावरही झालेला आहे.

पूर्वी मोबाईल कंपन्यांचे वितरक; तसेच विक्रेत्यांकडून रिचार्ज सेवा उपलब्ध व्हायची. रायगड जिल्ह्यामध्ये विविध कंपन्यांनी रिचार्ज व्यवसायासाठी जिल्हा व तालुका पातळीवर वितरक नेमले होते. त्या वितरकांकडे सिम कार्ड व रिचार्ज व्यवसाय केला जातो.

हे वितरक वेगवेगळ्या गावांतील विक्रेत्यांशी जोडलेले असायचे. ही कामे करण्यासाठी वितरकांनी काही तरुण मंडळी कामासाठी नेमली होती. मोबाईल रिचार्ज कंपन्या वितरकाला १.५ टक्के, तर विक्रेत्याला २.५ टक्के कमिशन देत असे. यातूनच वितरक, विक्रेते व काम करणाऱ्या तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध झाली होती.

काही वर्षांपासून ऑनलाइन रिचार्ज पद्धत सुरू झाल्याने वेगवेगळ्या कंपन्यांचे ॲप, वॉलेट; तसेच मेसेजद्वारे थेट रिचार्ज होऊ लागले. मोबाईलधारकांसाठी हे सोईचे असल्याने आणि त्यातही सुट व कॅशबॅक मिळत असल्याने ऑनलाईन रिचार्जचा वापर वाढू लागला. यामुळे विक्रेते, वितरक आणि तेथे काम करणारे कर्मचारी मात्र अडचणीत आले आहेत.

unemployment
Mobile Addiction : मोबाईल गेमचं व्यसन; १५ वर्षांचा मुलगा झोपेतच ओरडू लागला 'फायर-फायर'! मानसिक संतुलन बिघडल्यामुळे उपचार सुरू

वितरकांचा व्यवसाय २५ टक्क्यांनी कमी

रायगड जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या कंपन्यांचे ३० वितरक असून, त्यांचा सुमारे पाच कोटींचा व्यवसाय आता केवळ २५ टक्क्यांवर येऊन पोहोचला आहे. व्यवसाय कमी झाल्याने वितरकांनी त्यांच्याकडे काम करणारे मनुष्यबळ कमी केले. त्यामुळे प्रत्येक विक्रेत्याकडे असलेल्या ५ ते १० तरुणांपैकी काहीना रोजगारांना मुकावे लागले. पर्यायाने बेरोजगारी निर्माण झाली.

unemployment
Mobile Charging Tips : केवळ फोनच नाही, तर चार्जरमध्येही लागू शकते आग; अशी घ्या खबरदारी!

विक्रेत्यांमध्येही घट

वितरकांचा व्यवसाय कमी झाला, तसाच लहान-मोठ्या विक्रेत्यांनाही त्याचा फटका बसला. अनेक विक्रेत्यांनी हा व्यवसाय कमी झाल्याने आपल्याकडे रिचार्ज करणे बंद करून टाकले आहे.

केवळ मोबाईलच नव्हे तर इतर प्रकारचे रिचार्जही आता ऑनलाईन झाले आहेत. मुळातच या व्यवसायात कमिशन कमी मिळत होते. तरीही त्यात टिकून राहिलेला व्यवसाय ऑनलाईनने ओढून नेला आहे. त्यामुळे रिचार्ज विकणे आता अनेकांनी बंद केले आहे.

- रमेश शिंदे, विक्रेता

ऑनलाईन रिचार्जमध्ये अनेकदा कॅशबॅक, स्क्रॅच कार्ड किंवा पॉईंट मिळतात. विविध सवलती मिळत असल्याने ते परवडते.

- रवीराज पाटील, ग्राहक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.