सिंधुदुर्गात 80 टक्केच शाळा सुरू 

only 80 percent schools starte Sindhudurg district
only 80 percent schools starte Sindhudurg district
Updated on

ओरोस (सिंधुदुर्ग) - जिल्ह्यात 247 पैकी 204 शाळा सुरू झाल्या आहेत. ही टक्केवारी 80 एवढी आहे; मात्र एकूण 42 हजार 424 मुलांपैकी 12 हजार 767 मुलेच शाळेत दाखल झाली आहेत. एकूण 32 टक्के मुले शाळेत येत आहेत. मुलांची टक्केवारी गावोगावी एसटी नसल्याने वाढत नाही, अशी माहिती माध्यमिक शिक्षणाधिकारी अशोक कडूस यांनी शिक्षण समिती सभेत दिली. 

छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात सभापती सावी लोके यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेला सदस्य सुधीर नकाशे, संपदा देसाई, राजन मुळीक, प्रभारी शिक्षणाधिकारी रामचंद्र आंगणे यांच्यासह तालुक्‍याचे गटशिक्षणाधिकारी उपस्थित होते. यावेळी अभिनंदन व शोक ठराव घेण्यात आले. 

यावेळी सभागृहात जिल्ह्यातील नववी ते बारावीच्या किती शाळा सुरू झाल्या, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला. यावर बोलताना कडूस यांनी जिल्ह्यात शाळा सुरु होण्याचे प्रमाण 80 टक्के आहे; पण विद्यार्थी दाखल होण्याचे प्रमाण 32 टक्के आहे. जिल्ह्यातील नववी ते बारावीपर्यंत शिक्षण घेणारे बहुतांश विद्यार्थी हे एसटीने प्रवास करणारे आहेत; परंतु त्यांना गावातून येणारी शाळेच्या वेळेत एसटी नाही. त्यामुळे विद्यार्थी संख्या कमी झाली आहे, असे सांगितले. 

यावेळी कडूस यांनी एसटी नसल्याने विद्यार्थी शाळेत येत नसल्याकडे जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांचे आपण लक्ष वेधले होते. त्यांनी सिंधुदुर्ग विभाग नियंत्रक यांच्याशी चर्चा करून एसटी उपलब्ध करून देण्यास सांगितले आहे. मुलांना पास देण्याचेही आदेश दिले आहेत. शैक्षणिक वर्ष निश्‍चित न झाल्याने मुलींना देण्यात येणाऱ्या मोफत पासचा प्रश्‍न निर्माण झाला होता; मात्र मंजुलक्ष्मी यांनी 30 एप्रिल 2021 पर्यंत शैक्षणिक वर्ष निश्‍चित करीत पास देण्याच्या सूचना विभाग नियंत्रक यांना दिल्या असल्याचे यावेळी कडूस म्हणाले. 

शिक्षक नियुक्तीचे संस्थाचे अधिकार काढले 
सदस्या संपदा देसाई यानी बांदा येथील एका शिक्षाकाला पदोन्नती डावलून वेतोरे हायस्कूलमध्ये मुख्याध्यापक पदी नियुक्ती दिली आहे. वायंगणी हायस्कूलचे शिक्षक जिल्ह्यात नसताना त्यांचा गेली चार वर्षे पगार काढला जात आहे, याकडे लक्ष वेधले. यावर बोलताना माध्यमिक शिक्षणाधिकारो कडूस यांनी बांदा येथील हायस्कूलने बिंदु नामावली निश्‍चित न केल्याने आम्ही त्यांचा प्रस्ताव अमान्य केला आहे. वायंगणी हायस्कूलच्या या प्रकरणात उपसंचालक यांची सुनावणी झाली आहे, असे सांगितले. शासनाने शिक्षक भरतीचे अधिकार शिक्षण संस्थांकडून काढून घेतले. पवित्र पोर्टलद्वारे निवड होणाऱ्या उमेदवाराला थेट अथवा मुलाखत घेवून शिक्षक निवड केली जाणार आहे, असे यावेळी सांगितले. 

पाच प्रयोग शाळांसाठी 80 लाख 
जिल्हा नियोजनच्या नाविन्यपूर्ण योजनेतून मधून जिल्ह्यात पाच सर्वसुविधा युक्त सुसज्ज प्रयोगशाळा जिल्हा परिषद शाळात उभारण्यात येणार आहेत. यासाठी 80 लाख रुपये अनुदान मंजूर झाले आहे. एका प्रयोग शाळेसाठी 16 ते 18 लाख रुपये निधी मिळणार आहे. यासाठी शाळा निश्‍चिती करण्यात येत आहे, अशी माहिती रामचंद्र आंगणे यानी दिली. 

संपादन - राहुल पाटील

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.