मुरुडला मोटार बुडताना वाचवली

पर्यटकांचा अतिउत्साह ठरतोय धोकादायक
murud
murudsakal
Updated on

हर्णै : नाताळच्या सुट्टीमुळे कोकणात वीकेंडला पर्यटकांची आवक सुरू झाली आहे. परंतु येणाऱ्या पर्यटकांच्या दादागिरी, अरेरावीचा स्थानिकांना खूप त्रास सहन करावा लागत आहे. आज मुरुड समुद्र किनाऱ्यावर एक गाडी बुडता बुडता वाचली. यामुळे पोलीस प्रशासन, ग्रामपंचायत तसेच गावपातळी वरील ग्रामसुरक्षा दल आणि स्थानिक ग्रामस्थांनी मिळून यावर निर्बंध आणणे गरजेचे आहे ; अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे.

कोकणात फिरायला जायचं म्हटलं की दापोली किनारपट्टीला पर्यटक आवर्जून भेट देतात. थंड अल्लाहदायक वातावरण, शहरापासून अवघ्या काही अंतरावर असलेला दाभोळ ते केळशी पर्यंतचा समुद्र किनारा यामुळे दापोली तालुक्याला पर्यटनदृष्ट्या एक महत्वाचे स्थान आहे. पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, नाशिक, धुळे आदी जिल्ह्यातील पर्यटक कोकणातला निसर्गाचा आनंद लुटण्याकरिता हजर झाले आहेत. चौथा शनिवार रविवार आणि नाताळची सुट्टी लागल्यामुळे सलग सुट्टीच्या निमित्ताने शुक्रवारच्या पूर्वसंध्येला पर्यटक हजर झाले आहेत. दापोली तालुक्याच्या किनारपट्टीला व किनाऱ्यावर असणाऱ्या हॉटेल रिसॉर्टमध्ये पर्यटकांची रेकॉर्ड ब्रेक गर्दी दिसून येत आहे.

फिरायला आल्यावर या पर्यटकांचा आगाऊपणा स्थानिकांना त्रासदायक ठरतो. समुद्रावर आल्यावर पाण्यात पोहायला जाण्याचा मोह आवरेनासा होतो. तसेच आपली चारचाकी बीचवर नेऊन स्टंट करण्याचा मोहदेखील याना आवरत नाही. बरेचसे पुरुष पर्यटक अंतरवस्त्रावरच फिरत असतात.

मोठ्या चारचाकी गाड्या घेऊन पुळणीवर जाऊन स्टंटबाजी करतात यामध्ये आज मुरुड येथे तसा प्रकार घडला बिनधास्तपणे एकदम किनाऱ्यावर आपल्या गाड्या उभ्या करून पाण्यात उभे राहून पर्यटकांचे फोटो काढण्याचे काम सुरू होते. ग्रामस्थ वारंवार पाणी वाढेल गाड्या बाहेर काढा अश्या सूचना देत असून सुद्धा पर्यटकांनी त्याकडे दुर्लक्ष केले आणि अचानक पाणी वाढलं आणि नंतर गाडी काढायला गेल्यावर गाडी पूर्ण वाळूत रुतली.

तेंव्हा जे सी बी बोलावण्याची तयारी सुरू होती. त्याचवेळी आजूबाजूला उभे असलेले कमान २० ते २५ पर्यटकांनी धक्का देण्याचा प्रयत्न केला आणि त्या पर्यटकांच्या प्रयत्नाला यश आले. किमान १५ मिनिटे गाडी तिथेच थांबली असती तर पूर्ण गाडी पाण्याखाली गेली असती असे स्थानिकांनी सांगितले. अश्या दोन गाड्या आज मुरुड किनाऱ्यावर बुडता बुडता वाचल्या. सुदैवाने कोणतीही यावेळी हानी झाली नाही. परंतु अशा गोष्टींना आळा घालण्यासाठी तेथे प्रशासकीय व्यक्ती उपस्थित असणं गरजेचं आहे. शुक्रवार पासून किनारपट्टीला पर्यटकांची गर्दी होऊ लागली आहे तेंव्हा याठिकाणी पोलीस प्रशासन , होमगार्ड, किंवा ग्रामसुरक्षा दल यांनी या अनुचित प्रकारांना आळा घालण्यासाठी उपस्थित राहणं गरजेचे असल्याची मागणी स्थानिकांकडून होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.