Accident News : पाली खोपोली राज्य महामार्गावर चिवे गावाजवळ दुचाकीचा अपघात; पतीचा मृत्यू ,पत्नी गंभीर जखमी

एमएसआरडीसी वर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मनसेची मागणी
pali khopoli husband wife accident
pali khopoli husband wife accidentsakal
Updated on

पाली : पाली खोपोली राज्य महामार्गावर चिवे गावाजवळ लेक सिटी व म्युजिक सिटीच्या समोर गुरुवारी (ता.29) दुचाकीचा अपघात झाला. या अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला तर मागे बसलेली महिला गंभीर जखमी आहे.

हे दोघे पतीपत्नी आहेत. पाली खोपोली रस्त्याच्या दुरवस्थेमुळे हा अपघात झाल्याचा आरोप मनसे रायगड जिल्हा सचिव लता कळंबे यांनी केला असून यासाठी एमएसआरडीसीच्या अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

लता कळंबे यांनी या मागणीचे निवेदन तहसीलदार उत्तम कुंभार व पाली पोलीस स्थानकात मनसे पदाधिकारी व कायकर्त्यांसमवेत दिले.

रस्त्याच्या या सखल भागात मोठ्या प्रमाणात पाणी साठते. त्यामुळे येथून दुचाकी गेल्यास दुचाकीस्वाराचा तोल जातो किंवा स्लिप होते.

तसेच चारचाकी वाहने गेल्यास वेगाने पाणी दोन्ही बाजूला उडते अशावेळी बाजूने कोणते वाहन विशेषतः दुचाकी गेल्यास त्याच्यावर वेगाने पाणी उडते. अशावेळी समोरचे काही दिसत नाही. काचेवर पाणी उडल्याने चारचाकी वाहन चालक भांबावतो, तर दुचाकीस्वाराचा तोल जाऊन अपघात होतो.

pali khopoli husband wife accident
Nashik Accident News: शिरवाडे वणीला बसच्या धडकेत 3 ठार; ग्रामस्थांनी रोखला मुंबई-आग्रा महामार्ग

हा मार्ग अनेक ठिकाणी उंच व सखल आहे. परिणामी येथे पानी साठून अशा प्रकारे अपघात घडत आहेत. त्यामध्ये वाहन चालकांची कोणतीच चूक नसून रस्त्याच्या दुरवस्थेमुळे अपघात होत आहेत.

त्यामुळे कामात कामचुकारपणा व हलगर्जीपणा दाखवल्या बद्दल आणि त्यामुळे अपघात होऊन अनेकांच्या मृत्यूला कारणीभूत धरून एमएसआरडीसीच्या अभियंत्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी मनसेने केली आहे.

pali khopoli husband wife accident
Ratnagiri : शासनाचा उपक्रम ; ॲप वर फोटो टाका, ७२ तासांत खड्डेमुक्त व्हा!

पाली खोपोली राज्य महामार्गावर झालेल्या अपघातात निष्पाप जीवाचा बळी गेला असून एकजण गंभीर जखमी झाले आहेत. याबाबतचे मनसेच्या वतीने तक्रारी निवेदन आले आहे. त्यानुसार एमएसआरडीसी चे कार्यकारी अभियंता यांना संबंधित प्रकरणाची चौकशी करून पुढील कारवाई करण्याबाबत पत्राद्वारे कळविले आहे.

- उत्तम कुंभार, तहसीलदार, पाली-सुधागड

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.