Pali Nagarpanchyat : नगराध्यक्षांसह चौघे नगरसेवक अपात्र

अवघ्या दीड वर्षभरापूर्वी स्थापन झालेल्या पाली नगरपंचायतमध्ये अनेक स्थित्यंतरे व उलथापालथ घडत आहेत.
pali nagarpanchyat office
pali nagarpanchyat officesakal
Updated on

पाली - अवघ्या दीड वर्षभरापूर्वी स्थापन झालेल्या पाली नगरपंचायतमध्ये अनेक स्थित्यंतरे व उलथापालथ घडत आहेत. शुक्रवारी (ता.४) रायगड जिल्हाधिकाऱ्यांनी पालीतील नगराध्यक्षा चार नगरसेवकांच्या अपात्रेचा आदेश दिला.

नगराध्यक्ष निवडणुकीत पक्षाचा व्हीप झुगारल्याने शिवसेनेच्या नगरसेविका कल्याणी दपके व प्रतीक्षा पालांडे, शेकापचे नगरसेवक विनायक जाधव व नगराध्यक्षा प्रणाली शेळके हे चारजण अपात्र झाले आहेत. तर शिवसेनेचे सचिन जवके यांना नगरसेवक तिसरे अपत्य असल्याने अपात्र झाले आहेत.

जानेवारी २०२२ मध्ये पाली नगरपंचायतीची पहिली निवडणूक झाली. नोव्हेंबर २०२२ मध्ये नगरपंचायतीच्या पहिल्या नगराध्यक्षा गीता पालरेचा यांनी राजीनामा दिल्याने नगराध्यक्ष पद रिक्त होते. या रिक्त पदाची निवडणूक विशेष सभेचे आयोजन करून १४ डिसेंबर २०२२ मध्ये घेण्यात आली. यावेळी शेकापच्या प्रणाली पाटील-शेळके यांनी बंडखोरी करत पक्षाचा व्हीप झुगारून अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला होता. त्यांना ११ मते व शेकापचे आरिफ मणियार यांना ५ मते मिळाल्‍याने नगराध्यक्षपदी प्रणाली शेळके निवडून आल्या.

नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीपूर्वी शिवसेना व शेकापने आपल्या पक्षातील नगरसेवकांना व्हीप (पक्षादेश) काढला होता. मात्र शिवसेनेच्या चार नगरसेवकांपैकी दोघांनी व्हीप झुगारून प्रणाली पाटील-शेळके यांना तर दोघांनी आरिफ मणियार यांना मतदान केले.

तर शेकापच्या तीनपैकी दोघांनी व्हीप झुगारून प्रणाली शेळके (यात प्रणाली शेळके स्वतः) यांना तर एकाने आरिफ मणियार यांना मतदान केले. हे प्रकरण रायगड जिल्हाधिकारी यांच्याकडे गेल्यावर शुक्रवारी चार नगरसेवकांच्या अपात्रेचा आदेश दिला.

तीन अपत्‍य असल्‍याने अपात्र

पाली नगरपंचायतीच्या नगरसेविका कल्याणी दपके यांनी, नगरसेवक सचिन जवके यांच्या विरोधात तीन अपत्य असूनही निवडणूक लढविल्यासंदर्भात जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रारी अर्ज केला होता. त्यानुसार चौकशी व सुनावणीनंतर सचिन जवके यांच्या अपात्रतेचा आदेश देण्यात आला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.