Kokan Breaking - पणदेरी परिसरातील गावांना सतर्कतेचा इशारा

सांडव्याची भिंत फोडून पाणीपातळी कमी करणार
Kokan Breaking - पणदेरी परिसरातील गावांना सतर्कतेचा इशारा
Updated on

मंडणगड : पणदेरी धरणाच्या (panderi dam) कालवा विहिरीजवळ लागलेली मोठी गळती उपाययोजना व अथक प्रयत्नानंतरही थांबत नसल्याने विसर्ग सांडव्याच्या भिंतीचा काही भाग ब्लास्टिंगने फोडून धरणातील पाणीसाठा कमी करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे. जिल्हाधिकारी (ratnagiri collector) लक्ष्मीनारायण मिश्रा, मुख्य कार्यकारी अभियंता यांनी (६) जुलै रोजी धरण व गळती काढण्याच्या कामाची पाहणी केली. (panderi-dam-mandangad-appeal-people-migrate decreased-water-storage)

धरण पूर्ण क्षमतेने भरले असल्याने धरणातील पाणी सोडून जलाशयाची पातळी कमी करण्याचे आदेश दिल्याचे वृत्त पुढे आले आहे. त्यामुळे या संपूर्ण परिसरातील पणदेरी, बहिरीवली, कोंडगाव गावांना सर्कतेचा इशारा (migrate) देण्यात आला आहे. आज सकाळी १० नंतर कोणीही घरातून बाहेर पडू नये, सुरक्षित स्थळी जावे असे आवाहनही तलाठी, ग्रामसेवक, महसूल अधिकाऱ्यांनी केल्याचे स्थानिक ग्रामस्थांनी सकाळशी बोलताना सांगितले.

Kokan Breaking - पणदेरी परिसरातील गावांना सतर्कतेचा इशारा
येत्या 48 तासांत मान्सून 'कमबॅक'; मुसळधार पावसाची शक्यता

सखल भागात वसलेल्या घरातील नागरिकांना स्थलांतरित करण्यात आले आहे. धरणाचं पाणी पणदेरी नदीमार्गे सावित्री नदी व खाडी पात्रात सोडण्यात येणार आहे. कुठल्याही परिस्थितीत परिसरातील नागरिकांनी नदीच्या काठी जावू नये. घाबरून न जाता सुरक्षिततेच्या व सतर्कतेच्या कारणास्तव सर्व परिसरातील नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी जावे असे आवाहन प्रशासनाच्या वतीने वारंवार करण्यात आल्याची माहिती स्थानिक ग्रामस्थांनी दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()