रत्नागिरी : गावपऱ्यातील वहाळात मिऴाली बेवारस बालिका

पांगरी येथील प्रकार ; अत्यवस्थ स्थितित काचपेटीत
अवघ्या एक वर्षाची अत्यवस्थेत बेवारसपणे पडलेली मुलगी सापडली
अवघ्या एक वर्षाची अत्यवस्थेत बेवारसपणे पडलेली मुलगी सापडलीsakal
Updated on

रत्नागिरी : संगमेश्वर तालुक्यातील पांगरी येथील गावपऱ्यातील वहाळात अवघ्या एक वर्षाची अत्यवस्थेत बेवारसपणे पडलेली मुलगी सापडली. ही मुलगी तीन दिवस या वहाळात विव्हळत पडली असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. आज सकाळी ती निदर्शनास आल्याने पांगरी परिसरात हा चर्चेचा विषय बनला आहे. पांगरी गावातील मंडळी, ग्रामस्थ, सरपंच, पोलिस पाटील, ग्रामसेवक तसेच देवरुख प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांनी या मुलीला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे. अद्यापही या मुलीची प्रकृती स्थिर नाही, असे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.

अवघ्या एक वर्षाची अत्यवस्थेत बेवारसपणे पडलेली मुलगी सापडली
रत्नागिरी : आरटीओमध्ये वाहनांची बनावट नोंदणी उघड

गेली तीन दिवस ग्रामस्थांना या पांगरी-गावपऱ्याच्या ठिकाणी लहान मुलांचा रडण्याचा विव्हळण्याच आवाज येत होता. मात्र कोणाची तरी मुलगी रडत असावी,असा समज करून त्याकडे दुर्लक्ष होत होत. तसेच एवढ्या थंडीतून जंगलात जाण्याचे धाडसही कोणी दाखविले नाही. मात्र आज सरपंच सुनील कृष्णा म्हादये व दत्ताराम जाधव हे सकाळी दहा वाजता कामावर येत असताना त्यांना मुलाचा रडण्याचा आवाज आला. तत्काळ त्यांनी आवाजाच्या दिशेने पावले उचलली. त्यावेळी पांगरी गावपऱ्याच्या जंगलात त्यांना बेवारस अवस्थेत पडलेली मुलगी दिसली. तत्काळ त्यांनी ग्रामसेवक अखिलेश गमरे, पोलिस पाटील श्वेता कांबळे, गावकर प्रभाकर तेगडे, सोनाली चव्हाण, मंगेश राऊत, दिनेश मुळ्ये यांना माहिती दिल्यानंतर ते तत्काळ घटनास्थळी दाखल झाले.

अवघ्या एक वर्षाची अत्यवस्थेत बेवारसपणे पडलेली मुलगी सापडली
सातारा : किरपेतील बिबट्या अखेर वनविभागाच्या पिंजऱ्यात जेरबंद

मुलीच्या नाका-तोंडाला मुंग्या लागल्या होत्या. तिच्या अंगावर वस्त्र टाकून पांगरी ग्रामस्थांनी खासगी वाहनाने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. तिच्यावर उपचार सुरू आहेत. मात्र मुलीची प्रकृती चिंताजनक आहे. तिची फक्त हालचाल सुरू आहे. तिला अपघात विभागात पेटीत ठेवण्यात आले आहे. ईश्वर करो आणि मुलगी लवकरात लवकर बरी होवो अशी भावना तेथे जमलेल्या सर्व ग्रामस्थांनी, व्यक्त केली. मुलीची अवस्था पाहुन ग्रामस्थांपैकी काहींचे डोळे पाणावले होते. घटनेची माहितीमिळताच जिल्हा शल्य चिकित्सकांसह वैद्यकीय अधिकारी तसेच देवरुख आरोग्य अधिकारी, तसेच पोलिसांनी अपघात विभागात धाव घेतली. मात्र या बेवारसस्थितीत सापडलेल्या मुलीच्या क्रुरकर्मा मातेबाबत संताप व्यक्त केला जात आहे. जवळपासच्या गावातील ही मुलगी आहे की अन्य ठिकाणाहुन आणुन टाकली आहे, याचा तपास आता पोलिस घेत आहेत.

मुलीची प्रकृती अचुनही चिंताजनकच आहे. आम्ही उपचार सुरू केले आहेत. पण मुलीला एक प्रकारचा धक्का (शॉक ) बसला आहे. ती तीन दिवस थंडी, वाऱ्यात कशी राहिली हे विशेष आहे. आम्ही प्रयत्न करीत आहोत.

डॉ. संघमित्रा फुले, जिल्हा शल्य चिकित्सक रत्नागिरी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()