चिपळूण : गेल्या काही वर्षांपासून परशुराम घाटात रखडलेले मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम गतीने सुरू झाले आहे. परशुराम बसथांब्यावरून मंदिर व गावाकडे जाण्यासाठी स्काय वे ची (पादचारी पूल) व्यवस्था करावी तसेच परशुराम घाटात संपूर्णपणे संरक्षक भिंत आदी मागण्या परशुरामच्या ग्रामसभेत ग्रामस्थांनी केल्या. याबाबतचे पत्र प्रशासनाकडे दिले आहे.(Parashuram Ghat needs a protective wall)
मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाटात संपादित जमिनीच्या मोबदल्यासाठी चार वर्षे चौपदरीकरणाचे काम रखडले होते; मात्र या घाटातील रस्ता अनेक ठिकाणी खचल्याने व दरडीचा धोकाही वाढला आहे. या परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेत, मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेची गंभीर दखल घेतली गेली. न्यायालयाने पोलिस बंदोबस्तात हे काम सुरू करण्याच्या सूचना दिल्या होत्या. अजूनही या कामातील काही त्रुटी ग्रामस्थांनी राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या निदर्शनास आणून देत सूचना केल्या आहेत.(road in the ghats was eroded in many places and the danger of flooding also increased)
यासाठी २३ ला परशुराम ग्रामपंचायतीत ग्रामसभा झाली. या वेळी ग्रामस्थांनी मंदिर व गावाकडे जाण्यासाठी पादचारी पूल, परशुरामहून पेढे येथे जाण्यासाठी पाखाडी, डोंगर पोखरताना विशेष काळजी घ्यावी, डोंगर मुरूमाचा व ठिसूळ असल्याने रस्त्याचे काम टप्प्याटप्याने करावे, वाढत्या पावसाचा विचार करून जागोजागी मोऱ्या बांधाव्यात, जुन्या वाटा सुस्थितीत करून मिळाव्यात, सवतसडा धबधबा येथे जाण्यासाठी उड्डाणपूल, अशा मागण्या केल्या आहेत. परशुराम मंदिर तसेच गावाकडे जाण्यासाठी असलेल्या मार्गास सर्व्हिस रोडची व्यवस्था करणार आहे. हे सर्व्हिस रोड दोन्ही बाजूस असल्याचे राष्ट्रीय महामार्गकडून ग्रामस्थांना सांगण्यात आले आहे.
पावसाळ्यात सातत्याने परशुराम घाटात दरडी कोसळण्याच्या घटना घडतात. घाटाला लागूनच ऐतिहासिक परशुराम मंदिर आणि गाव आहे. त्यामुळे संपूर्ण घाटात संरक्षक भिंत उभारण्याची मागणी ग्रामस्थांच्या सूचनेनुसार प्रशासनाकडे केली.
- गजानन कदम, सरपंच
ग्रामसभेत विविध मागण्या...
मंदिर, गावाकडे जाण्यासाठी पादचारी पूल
परशुरामहून पेढे येथे जाण्यासाठी पाखाडी
डोंगर ठिसूळ; रस्त्याचे काम टप्प्याटप्याने करा
सवतसडा धबधबा येथे जाण्यासाठी उड्डाणपूल
जुन्या वाटा सुस्थितीत करून मिळाव्या
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.