राणेंवर दबाव ठेवण्यासाठी रत्नागिरीत सामंत अस्त्र

CM Uddhav Thackeray Decision Guardian Minister  In Ratnagiri  Marathi News    
CM Uddhav Thackeray Decision Guardian Minister  In Ratnagiri  Marathi News    
Updated on

रत्नागिरी : परब यांना सिंधुदुर्ग दिल्यास विरोधी पक्षातील काही नेत्यांशी असलेले हितसंबंध पक्षाला मारक ठरतील. विरोधी गटावर दबाब ठेवणे कठिण होण्याची शक्यता आहे. मात्र उदय सामंत यांनी आपल्या मुरब्बी राजकारणाने राणेंना अनेक निवडणुकांमध्ये शह दिला आहे. राणेंवर दबाव ठेवण्यासाठी सामंत अस्त्रच प्रभावी ठरेल, म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्रीपद सामंताना दिल्याची चर्चा आहे. 


उच्च तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांना रत्नागिरी जिल्ह्याचे पालकत्व देऊन अनेक वर्षांचा अनुशेष शिवसेना भरून काढणार, अशी अपेक्षा होती. मात्र ऐन वेळेला परिवहन मंत्री अ‍ॅड. अनिल परब यांना पालकमंत्रिपद देऊन शिवसेनेने राजकीय डाव साधला आहे. सामंतांना सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्रिपद देऊन शिवसेनेने नवीन राजकीय चाल खेळल्याची चर्चा आहे. पालकमंत्र्यांच्या घोषणेनंतर सर्वांचीच निराशा झाली. रायगडमध्ये आदिती तटकरे यांना पालकमंत्रिपद मिळाले. मात्र रत्नागिरीवर पुन्हा शिवसेनेने अन्याय केल्याची सर्वांची भावना आहे. मात्र शिवसेनेचे त्यामागे वेगळे राजकीय गणित आहे. 

हितसंबंध दूर ठेवण्याची खेळी 

उदय सामंत यांना रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्रिपद दिले तर सिंधुदुर्गमध्ये भाजपचे खासदार नारायण राणे यांना कोण रोखणार? असा प्रश्‍न होता. राणे यांना रोखायचे असेल तर लोकसभा निवडणुकीत ज्या पद्धतीने सामंत यांनी राणेंना जेरीस आणले तीच चाल आता पुढील राजकीय वाटचालीत आवश्यक आहे. सामंतच राणेंना तोडीस-तोड उत्तर देऊ शकतात. तेथील खाचखळगे त्यांना माहित आहे, याची पूर्व कल्पना शिवसेनेच्या नेतृत्वाला आहे. अ‍ॅड. अनिल परब मुळचे सिंधुदुर्गचे आहेत. मात्र त्यांचे राजकीय आयुष्य मुंबईत गेले आहे. परब यांना सिंधुदुर्ग आणि सामंत यांना रत्नागिरी पालकमंत्रिपद दिले तर परब यांना येथील राजकीय स्थितीतील बारकावे माहिती नाहीत. त्याचा फायदा राणे उठवणार. 

विकासासाठी स्थानिक पालकमंत्री आवश्यक
विरोधीगटातील नेत्यांशी परब यांचे चांगले संबंध अडचणीनेच ठरण्याची शक्यता आहे. त्याचा विचार करूनच उद्धव ठाकरे यांनी पालकमंत्रिपदाची अदलाबदल केल्याचे समजते. 
स्थानिक पालकमंत्री आवश्यकगेल्या पाच वर्षांमध्ये मुंबईतील रवींद्र वायकर यांना पालकमंत्रिपद दिले. पदाधिकार्‍यांशीच त्यांचे सूर जुळले नाही. त्यामुळे संघटन बांधणी आणि विकासात्मक तसा त्यांचा जिल्ह्याला उपयोगच झाला नाही. जिल्ह्याचा विकास साधायचा असेल तर स्थानिक पालकमंत्री आवश्यक असल्याची चर्चा शिवसेनेच्याच पदाधिकार्‍यांमध्ये सुरू आहे.


उद्धव ठाकरेंचा निर्णय विचारपूर्वक
पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जो निर्णय घेतला आहे, त्यामागे काहीतरी धोरण असेल, पक्षहित असेल. म्हणूनच त्यांनी सामंत साहेबांना सिंधुदुर्ग तर परब साहेबांना रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्रिपद दिले आहे. 

-बिपिन बंदरकर,रत्नागिरी शहर प्रमुख
 


 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.