Elephantiasis Symptoms : दहा वर्षांनंतर हत्तीरोगबाधित आढळल्याने आरोग्य यंत्रणा सतर्क; काय आहेत रोगाची लक्षणे?

जिल्ह्यात १० वर्षांनंतर पुन्हा एकदा हत्तीरोग (Elephantiasis Symptoms) बाधित रुग्ण आढळून आला.
Elephantiasis Symptoms
Elephantiasis Symptomsesakal
Updated on
Summary

सिंधुदुर्ग जिल्ह्यात २०१४ मध्ये हत्तीरोगाचे ७१ रुग्ण आढळले होते. हे सर्व रुग्ण सध्या उपचारांवर आहे.

ओरोस : जिल्ह्यात १० वर्षांनंतर पुन्हा एकदा हत्तीरोग (Elephantiasis Symptoms) बाधित रुग्ण आढळून आला. मालवण तालुक्यात हा रुग्ण आढळून आला असून, २०१४ नंतर हत्तीरोगाचा रुग्ण आढळला. या पार्श्वभूमीवर जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. रुग्ण आढळलेल्या ठिकाणी आरोग्य यंत्रणेमार्फत संबंधित रुग्ण उपचारांखाली आणला आहे.

Elephantiasis Symptoms
Almatti Dam : कोल्हापूर, सांगलीला महापुराचा धोका? 'आलमट्टी'चा विसर्ग कमी केल्यास गंभीर स्थिती उद्भवणार!

रुग्ण आढळलेल्या भागात आरोग्य यंत्रणेमार्फत सर्वेक्षणास सुरुवात केली असून, या भागातील नागरिकांचे रक्ताचे नमुने घेण्यात येत आहेत. त्यामुळे नागरिकांनी घाबरू नये आणि आरोग्य यंत्रणेला सहकार्य करावे, असे आवाहन आरोग्य यंत्रणेने केले आहे.

दैनंदिन जीवनात अडथळा ठरणारा हत्तीरोग ‘क्युलेक्स’ जातीच्या डासापासून होतो. यामध्ये रुग्णांचे पाय आकाराने जाड होतात व हालचालींवर बंधने येतात. तुंबलेली गटारे, डबक्यातील घाण पाण्यात या डासांची उत्पत्ती होते. हाच डास हत्तीरोग बाधित रुग्णास चावून इतरांना चावल्यास हा आजार पसरतो. सिंधुदुर्ग जिल्ह्यात २०१४ मध्ये हत्तीरोगाचे ७१ रुग्ण आढळले होते. हे सर्व रुग्ण सध्या उपचारांवर आहे.

Elephantiasis Symptoms
धक्कादायक! नात्यातल्या व्यक्तीने अत्याचार केल्याने अल्पवयीन मुलगी सहा महिन्यांची राहिली गर्भवती; पोटात दुखू लागलं अन्..

त्यानंतर हत्तीरोगाचा प्रादुर्भाव वाढू नये, याकरिता जिल्हा हिवताप विभागामार्फत सातत्याने जनजागृती करण्यात येत होती. स्वच्छतेचे महत्त्वही पटवून देण्यात येत होते. परिणामी २०१४ पासून आतापर्यंत जिल्ह्यात नव्याने रुग्ण आढळला नव्हता; मात्र आता तब्बल १० वर्षांनी मालवण तालुक्यातील एका महिलेचा अहवाल हत्तीरोग बाधित आढळला. या महिलेच्या रक्तात हत्तीरोगाचे जंतू आढळले आहेत. पुणे येथील एनआयव्ही प्रयोगशाळेत याचे निदान झाले आहे.

आरोग्य यंत्रणेमार्फत सर्वेक्षण

मालवण तालुक्यातील ज्या भागातील महिलेच्या रक्तात हत्तीरोगाचे जंतू आढळले आहेत, त्या भागातील नागरिकांचे आरोग्य यंत्रणेमार्फत सर्वेक्षण सुरू केले आहे. यासाठी प्रत्येकी ८ जणांच्या दोन पथकांमार्फत रक्त नमुने गोळा करण्यास सुरुवात केली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com