'कर भरा आणि विमा संरक्षण मिळवा' सिद्धनेर्ली ग्रामपंचायतीचा निर्धार

सिद्धनेर्ली येथील ग्रामपंचायतीने 'कर भरा आणि विमा संरक्षण मिळवा' अशी अभिनव योजना मिळकत धारकांसाठी जाहीर केली आहे.
'कर भरा आणि विमा संरक्षण मिळवा' सिद्धनेर्ली ग्रामपंचायतीचा निर्धार
sakal
Updated on

सिद्धनेर्ली : सिद्धनेर्ली येथील ग्रामपंचायतीने 'कर भरा आणि विमा संरक्षण मिळवा' अशी अभिनव योजना मिळकत धारकांसाठी जाहीर केली आहे. संपुर्ण कर भरणाऱ्या नागरिकांना एक लाख रूपयांचे अपघात विमा संरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. याचा लाभ बाराशेहून अधिक मिळकत धारकांना होणार आहे. याबाबतचा निर्णय आज झालेल्या मासिक सभेत घेण्यात आला आहे. अशी माहिती सरपंच दत्तात्रय पाटील यांनी दिली.

'कर भरा आणि विमा संरक्षण मिळवा' सिद्धनेर्ली ग्रामपंचायतीचा निर्धार
रत्नागिरीतील 10 पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या

गतवर्षी या ग्रामपंचायतीने संपूर्ण कर भरणाऱ्या नागरिकांसाठी 'कर भरा आणि सोनी जिंका' अशी अभिनव योजना जाहीर करून यशस्वीपणे राबवली होती. त्यामुळे नागरिकांनी मोठ्या प्रमाणात कर भरला होता. या करापोटी जमा झालेल्या रकमेतील काही रक्कम या ग्रामपंचायतीने ठेव म्हणून बँकेत ठेवली आआहे.त्यानंतर आता विमा संरक्षण देण्याचा निर्णय घेतल्याने नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे.

न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनीच्या सहकार्याने जनता वैयक्तिक समुह अपघात विमा म्हणून ही योजना राबविण्यात येणार आहे. वर्षभराच्या काळात मिळकतधारकांचा अपघाती मृत्यू झाल्यास कायमचे अपंगत्व आल्यास किंवा दोन अवयव गमावल्यास एक लाख रुपयांपर्यंत विमा मिळणार आहे. तर 50 टक्के पर्यंत अपंगत्व आल्यास 50 हजार रुपयांपर्यंत विमा संरक्षण मिळणार आहे.

'कर भरा आणि विमा संरक्षण मिळवा' सिद्धनेर्ली ग्रामपंचायतीचा निर्धार
शिवगंगा नदीत बुडालेल्या 'त्या' तरुणाचा मृतदेह अखेर सापडला

यावेळी उपसरपंच मनोहर लोहार, सदस्य संदीप पाटील, दशरथ हजारे, अमर पाटील, युवराज पाटील, कल्याणी कुरणे, वर्षा आगळे, संगीता पवार, रत्नप्रभा गुरव, कुसुम मेटील, रेखा मगदूम, उज्ज्वला पवार, विद्या कांबळे, वनिता घराळ, ग्रामसेवक अजित जगताप, विजय पाटील आदी उपस्थित होते.

"कोरोना व महापुरासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे नागरिक ग्रामपंचायतीकडील कर भरण्यासाठी टाळाटाळ करीत आहेत. त्यामुळे वसुलीअभावी अनेक ग्रामपंचायतींना विविध प्रकारच्या देखभाल दुरूस्तीसह ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे पगार भागविताना कसरत करावी लागत आहे. शिवाय कर वसुलीसाठी दारात गेल्यावर वादाचे प्रसंग उदभवतात. हे टाळण्यासाठी नागरिकांनी उत्स्फूर्तपणे ग्रामपंचायतीकडील कर भरावेत. व अशा प्रामाणिकपणे कर भरणार्‍या नागरिकांना ग्रामपंचायतीकडून काही ना काही परतावा द्यावा. या उद्देशाने हा निर्णय घेतला आहे. नागरिकांनी कर भरून या योजनेचा लाभ घ्यावा."- सरपंच दत्तात्रय पाटील

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.