पेट्रोल, डिझेल, गॅसचे दर कमी करा ; महागाईच्या चटक्‍यांनी हैराण

petrol gas price increase chiplun tehsil
petrol gas price increase chiplun tehsil
Updated on

चिपळूण - केंद्र सरकारने राबवलेल्या नवीन आर्थिक धोरणामुळे सर्वसामान्य जनतेचे कंबरडे मोडले आहे. येत्या काही दिवसात पेट्रोल 100 लिटर होण्याच्या मार्गावर आहे. पेट्रोल, डिझेलसह घरगुती इंधनाच्या दरातही सरकारने वाढ केली. त्यामुळे नवीन आर्थिक धोरणात केंद्र सरकारने देशातील गरीब, शेतकरी, कामगार, मजूर, गृहिणी व बेरोजगारांची फसवणूक केली आहे. केंद्र सरकारने पेट्रोल, डिझेल, घरगुती इंधनाचे वाढीव दर कमी करावेत, अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेस पदाधिकाऱ्यांनी तहसीलदार जयराज सूर्यवंशी यांना निवेदन दिले.

तालुकाध्यक्ष जयंद्रथ खताते, माजी सभापती शौकत मुकादम म्हणाले, गेल्या चार-पाच वर्षात पेट्रोल, डिझेल व घरगुती इंधनाच्या दरात वाढ झाली आहे. केंद्र सरकारने नुकतेच बजेट जाहीर केले. त्यामध्ये इंधनावर अप्रत्यक्ष अधिभार लावण्यात आल्याने त्याच्या किमती वाढल्या आहेत. सर्वसामान्य जनतेला वाढत्या महागाईचे चटके बसू लागले आहेत. केंद्र सरकारच्या नवीन आर्थिक धोरणामुळे महागाई मोठ्या प्रमाणात वाढत आहे. देशातील बडे उद्योजक खुश होण्यासाठी केंद्राकडून त्यांच्या हिताचे निर्णय घेतले जातात. मोदी सरकारची सर्वसामान्यांच्या हिताचे निर्णय घेण्याची मानसिकता दिसत नाही. त्यामुळे देशभरात विविध क्षेत्रातून आंदोलनाच्या घटना घडत आहेत. त्यामुळे वाढती महागाई कमी व्हावी, पेट्रोल, डिझेल, व घरगुती इंधनाचे दर कमी करावेत, अशी मागणी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी केली.

निवेदन देताना तालुकाध्यक्ष जयंद्रथ खताते, दादा साळवी, माजी सभापती शौकत मुकादम, शहराध्यक्ष मिलिंद कापडी, सुचय रेडीज, नगरसेवक बिलाल पारकर, वर्षा जागुष्टे, शिवानी पवार, युवक जिल्हाध्यक्ष योगेश शिर्के, समीर काझी, मनोज जाधव, सचिन साडविलकर, अक्षय केदारी आदी उपस्थित होते.


संपादन - धनाजी सुर्वे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.