आंबोली धबधब्याची दुरवस्था 

The plight of Amboli Falls
The plight of Amboli Falls
Updated on

आंबोली (सिंधुदुर्ग) - येथील धबधब्याची देखभाल दुरूस्तीअभावी दुरवस्था झाली आहे. येथे पावसाळ्यात 3 वर्षे उत्पन्न पारपोली वनसमितीने नेले; मात्र धबधब्याकडे एक रुपया देखील खर्च झाला नाही. सध्या पावसाळ्यात जुलैमध्ये पायऱ्यांवर मोडून पडलेले झाड अद्यापही यावर्षी काढता आलेले नाही. रेलिंगची दुरवस्था झाली आहे. 

आंबोली धबधब्याचा विकास आंबोली ग्रामपंचायतीच्या माध्यमातून झाला होता. त्यासाठी लाखोंचा निधी आंबोली पर्यटनमधून खर्च झाला होता. 1992 ला लुपिन फाउंडेशने पायऱ्या बांधल्या होत्या. त्यानंतर दोनवेळा आंबोली ग्रामपंचायतमार्फत निधी खर्च झाला. आंबोली पर्यटनमधून निधी खर्च झाला. त्याठिकाणी पायऱ्या 2010 मध्ये बांधण्यात आल्या. याठिकाणी पाईप चोरीला गेल्यानंतर याठिकाणी अपघात होऊ लागले. याठिकाणी रेलिंगचे काम अंबोलीतील सामाजिक कार्यकर्ते, पत्रकारांनी तत्कालीन उपवनसंरक्षक एस. रमेश कुमार यांच्याकडून 2016 मध्ये मंजूर करून काम करून घेतले. दोनवेळा तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी येथे वेगळे काहीतरी तळी बांधण्याचा प्रस्तावही बांधकाम विभागाला घेऊन केला होता.

यानंतर पालकमंत्री आणि ग्रामविकास राज्यमंत्री असताना दीपक केसरकर यांनी अडीच कोटी जिल्ह्यातील धबधब्यासाठी पर्यटन मंडळाकडून निधी आणला. त्यातील 60 लाख आंबोली येथे 5 धबधब्यासाठी निधी मंजूर होता; मात्र वनखाते असल्याने निधी 3 लाख खर्च होऊन बाकी निधी परत गेला; मात्र 2017 नंतर आंबोली मुख्य धबधब्याकडे पारपोली ग्रामपंचायतीने वनसमितीमार्फत लाखो रुपये गोळा केले त्यातून देखभाल दुरुस्तही करणे अपेक्षित होते. त्याठिकाणी त्यांनी काहीही केले नाही. त्यामुळे सध्या तेथे पर्यटकांना जाण्यास अडचणी येत आहे. वनखात्याने याकडे लक्ष देणे आवश्‍यक आहे. 

आंबोली ग्रामपंचायतीच्या माध्यमातून आणि आंबोली पर्यटनमधून धबधब्याचा विकास करण्यात आला आहे. तेथील दुरवस्थेला वनखाते जबाबदार असून आंबोलीचे उत्पन्न बुडवण्यास कारणीभूत आहे. पर्यटनाची वाताहत आंबोलीत शिवसेनेची सत्ता आल्यावर झाली आणि ग्रामपंचायतीचे उत्पन्न बुडवण्यास ग्रामपंचायतीचा अपयशी कारभार जबाबदार आहे. 
- गजानन पालेकर, माजी सरपंच, आंबोली  

संपादन - राहुल पाटील

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.