कोकणात आता बेघरांच्या घराचे स्वप्न लवकरच होणार पूर्ण

the pm modi awas policy run in konkan also people help in ratnagiri
the pm modi awas policy run in konkan also people help in ratnagiri
Updated on

राजापूर (रत्नागिरी) : प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत राज्यामध्ये राबविण्यात येत असलेल्या शंभर दिवसांसाठी महाआवास अभियानाला तालुक्‍यामध्ये चांगला प्रतिसाद मिळाला आहे. तालुक्‍याच्या निर्धारित 253 उद्दिष्टांपैकी 143 लाभार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. त्यापैकी मंजुरी मिळालेल्या 92 लाभार्थ्यांची घरे प्रगतीपथावर आहेत. प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत बेघर असलेल्यांचे स्वतःच्या हक्काचे घराचे स्वप्न पूर्ण होणार आहे. 

समाजातील प्रत्येकाचे स्वतःच्या हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण होण्यासाठी शासनातर्फे प्रधानमंत्री आवास योजना राबविली जात आहे. त्यामध्ये बेघर असलेल्या प्रत्येकाला घर देण्याचे शासनाने निश्‍चित केले आहे. त्याप्रमाणे शासनातर्फे गावोगावी सर्व्हेक्षण करून लाभार्थ्यांची निवड निश्‍चित करण्यात आली होती. पहिल्या टप्प्यामध्ये निवड झालेल्या लाभार्थ्यांचे घराचे स्वप्न पूर्ण झाले आहे. अद्यापही अनेक लाभार्थी घरापासून वंचित आहेत. त्यामुळे या योजनेला गती देण्याच्या उद्देशाने राज्य शासनाने शंभर दिवसांचे महाआवास अभियान राबविले. 

या योजनेमध्ये प्रत्येक लाभार्थ्याला 1 लाख 40 हजार रुपयांचे शासनातर्फे अनुदान दिले जाते. ही अनुदानाची रक्कम लाभार्थ्याला चार टप्प्यामध्ये दिली जाते. तालुक्‍यामध्ये 253 लाभार्थ्यांचे उद्दिष्ट ठेवले होते. त्यापैकी 141 लाभार्थ्यांची निवड करण्यात आली. कागदपत्रांची पूर्तता असलेल्या 92 लाभार्थ्यांना घरबांधणीला सुरवात करण्यास सांगण्यात आले आहे. 

महात्मा गांधी रोजगार हमी योजनेचाही लाभ प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत घराचे स्वप्न पूर्ण होण्यासाठी महात्मा गांधी रोजगार हमी योजनेचाही लाभार्थ्यांना हातभार मिळणार आहे. त्यामध्ये घराच्या बांधकामासाठी होणाऱ्या मजुरीसंबंधी लाभार्थ्याला 21 हजार 420 रुपये अनुदान मिळत आहे.

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.