Illegal Liquor Case : दारूसाठी 'त्यांनी' लढवली अनोखी शक्कल; पोलिसांना खबर मिळताच खेळ खल्लास

ट्रकमध्ये चोरकप्पा तयार करून ही दारू वाहतूक करण्यात येत होती.
Illegal Liquor Case
Illegal Liquor Caseesakal
Updated on
Summary

ट्रकच्या पाठीमागील हौद्यात चोर कप्पा तयार करून त्यामधून गोवा बनवटीच्या दारूची वाहतूक होत असल्याचे निदर्शनास आले.

बांदा : गोव्यातून गुजरातकडे (Gujarat) होणाऱ्या बेकायदा दारू वाहतुकीविरोधात येथील पोलिसांनी मंगळवारी (ता. 2) रात्री उशिरा कारवाई केली. या कारवाईत ११ लाख ६५ हजार ३९५ रुपयांच्या दारूसह दारू वाहतुकीसाठी वापरलेला सुमारे २० लाखांचा ट्रक, असा एकूण ३१ लाख ६५ हजार ३९५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

बेकायदा दारू वाहतूक प्रकरणी (Illegal Liquor Case) प्रदीपकुमार श्रीभगवती प्रसाद व महम्मद शबीर वहिदीभाई इंद्राशी, (दोघेही रा. राजकोट गुजरात) यांना ताब्यात घेण्यात आले. ट्रकमध्ये चोरकप्पा तयार करून ही दारू वाहतूक करण्यात येत होती. ही कारवाई मंगळवारी इन्सुली पोलिस तपासणी नाक्यावर झाली.

Illegal Liquor Case
Karnataka Election : विश्‍वासघाताची किंमत भाजपला लागली चुकवावी; नऊ वर्षांत बदलले चार मुख्यमंत्री

सहायक पोलिस निरीक्षक शामराव काळे व उपनिरीक्षक समीर भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली कॉन्स्टेबल प्रथमेश पोवार व कॉन्स्टेबल प्रसाद पाटील यांनी कारवाई केली. याबाबत सविस्तर माहिती अशी की ः गोव्याहून गुजरातच्या दिशेने ट्रकमधून बेकायदा दारू वाहतूक होणार असल्याची गोपनीय माहिती येथील पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार तपासणी नाक्यावर सापळा रचण्यात आला होता.

Illegal Liquor Case
Karnataka Election : मतांसाठी पंतप्रधान मोदींनी हिंदू-मुस्लिम धर्मियांत फूट पाडली; काँग्रेस अध्यक्षांचा गंभीर आरोप

रात्री अडीचच्या सुमारास नाक्यावर गोव्याहून गुजरातच्या दिशेने जाणाऱ्या ट्रकला (जीजे १२ एवाय १९३२) तपासणीसाठी थांबविण्यात आले. ट्रकच्या पाठीमागील हौद्यात चोर कप्पा तयार करून त्यामधून गोवा बनवटीच्या दारूची वाहतूक होत असल्याचे निदर्शनास आले.

Illegal Liquor Case
Nilesh Rane : उद्धव ठाकरेंच्या बारसू दौऱ्यापूर्वी राणेंचा मोठा गौप्यस्फोट; म्हणाले, भयानक घटना घडवण्याचा..

पोलिसांनी ५ लाख ७० हजार २४० रुपये किमतीच्या रॉयल स्टॅग व्हिस्कीच्या ५२८ काचेच्या बाटल्या, १ लाख ५ हजार ३०० रुपये किमतीच्या ब्लेंडर स्प्राईड व्हिस्कीच्या ७५० मिली मापाच्या ५४ बाटल्या, ७३ हजार ४४० रुपये किमतीच्या मॅजिक मोमेम्ट व्होडकाच्या ७२ बाटल्या, ५८ हजार ३२० रुपये किमतीच्या ब्ल्यू रिबंड प्रीमियमच्या ७२ बाटल्या, ५७ हजार रुपये किमतीच्या ब्लेंडेड स्कॉच व्हिस्कीच्या १८० मिली मापाच्या १०० बाटल्या, ७४ हजार २५० रुपये किमतीच्या ब्लेंडर स्प्राईड प्रीमियम व्हिस्कीच्या ६० मिली मापाच्या ४५० बाटल्या,१४ हजार ४०० रुपये किमतीच्या रॉयल चॅलेंज प्रीमियम व्हिस्कीच्या ७५० मिली मापाच्या १५६ बाटल्या, ६४ हजार ८०० रुपये किमतीच्या स्मिरनॉफ ऑरेंज ट्रिपलच्या १८० मिली मापाच्या १३५ बाटल्या, २१ हजार ६४५ रुपये किमतीच्या बॅगपायपर क्लासिक व्हिस्कीच्या ७५० मिली मापाच्या ३७ बाटल्या, तसेच २० लाख रुपये किमतीचा १२ चाकी ट्रक असे एकूण ३१ लाख ६५ हजार ३९५ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()