रत्नागिरी, ता. 19 : खेड तालुक्यातील भोस्ते घाटात एका पुरुषाचा सापळा आणि कवटी तसेच झाडाच्या फांदीवरती लोंबकळणारी दोरी काल संध्याकाळी सापडली असतानाच आता या प्रकरणाला वेगळेच वळण लागले आहे. सावंतवाडी, सिंधुदुर्ग येथील एका व्यक्तीला या ठिकाणी जंगलात मृतदेह असल्याचे स्वप्न पडले. त्याने ते खेड पोलिसाना येऊन सांगितले आणि त्यावरुन हा रहस्यमय सापळा आणि कवटीचे गूढ उकलल्याचा चमत्कारिक प्रकार पुढे आला आहे.