सिंधुदुर्गात १ हजार 171 ठिकाणीच होळी 

police information holi festival konkan sindhudurg
police information holi festival konkan sindhudurg
Updated on

सिंधुदुर्गनगरी - होळी उत्सव 28 मार्चपासून सुरू होत असून, सिंधुदुर्गातील काही गावांत मानपानावरून वाद आहेत. त्यामुळे तेथील कायदा आणि सुव्यवस्था बिघडू नये, म्हणून या गावात होळी उत्सवास निर्बंध घालण्यात आले आहेत. तहसीलदार स्तरावर हे वाद मिटविण्याचा प्रयत्न सुरू असून, यातील काही गावांमधील वाद मिटण्याची शक्‍यता आहे. सिंधुदुर्गात सार्वजनिक 538, तर खासगी 633 अशा एकूण एक हजार 171 ठिकाणी होळीचे पूजन केले जाईल, अशी माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयाकडून देण्यात आली. 

गणेशोत्सवानंतर उत्सव कोकणात दणक्‍यात साजरा होतो तो शिमगोत्सव. यंदा 28 मार्चपासून तो सुरू होत आहे. चाकरमानी शिमग्यासाठी मोठ्या संख्येने कोकणात येऊन ग्रामदैवतेच्या होळीसमोर नतमस्तक होतात. हातभेटीचा नारळ, नवस फेडले जातात. सिंधुदुर्ग जिल्ह्यात होळी उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. प्रत्येक गावात, वाडी-वस्तीवर होळी उभारण्यात येते. त्यानुसार सिंधुदुर्गात सार्वजनिक 538 ठिकाणी, तर खासगी 633 ठिकाणी होळी उत्सव साजरा करण्यात येणार आहे. सिंधुदुर्गातील काही गावांत मानपानावरून वाद आहेत. त्यामुळे तेथील कायदा आणि सुव्यवस्था बिघडू नये, म्हणून या गावात होळी उत्सवास तूर्तास निर्बंध घालण्यात आले आहेत. तहसीलदार स्तरावर हे वाद मिटविण्याचा प्रयत्न सुरू असून, यातील काही गावांमधील वाद मिटण्याची शक्‍यता आहे, असे पोलिस प्रशासनाकडून सांगण्यात आले. 

हे आहेत प्रशासनाचे निर्देश 
सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता जिल्हावासीयांनी होळी उत्सव अत्यंत साधेपणाने साजरा करावा, मंदिर विश्‍वस्त व पालखीधारकांनी आरोग्य यंत्रणेकडून कोरोना चाचणी करून घ्यावी, होळी उत्सवात 50 लोकांपेक्षा जास्त लोक जमा होणार नाहीत, याची दक्षता घ्यावी, कमीत कमी मानकरी यांच्या उपस्थितीत हा सण अत्यंत साधेपणाने साजरा करावा, उपस्थितांनी योग्य ते सामाजिक अंतर ठेवणे बंधनकारक राहील, सर्वांनी मास्क वापरणे बंधनकारक राहील, रात्री 11 नंतर संचारबंदी लागू असल्याने त्यापूर्वी सर्व धार्मिक कार्यक्रम आटोपून घ्यावेत, असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांचे आहेत. 

तालुकानिहाय होळी अशी 
*तालुका *सार्वजनिक होळ्या 
*दोडामार्ग *52 
*बांदा *26 
*सावंतवाडी *40 
*वेंगुर्ले *27 
*निवती *12 
*कुडाळ *91 
*सिंधुदुर्गनगरी *9 
*मालवण *59 
*आचरा *21 
*कणकवली *67 
*देवगड *67 
*विजयदुर्ग *25 
*वैभववाडी *38 
*एकूण *538 

संपादन - राहुल पाटील

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.