देवगडमध्ये तब्बल एक कोटीची व्हेल माशाची उलटी जप्त; 'उलटी'ची किंमत कशाच्या आधारावर ठरवली जाते?

Whale Fish Vomit : घटनास्थळी एका पिशवीमध्ये व्हेल माशाची उलटीसदृश पदार्थाचे लहान मेणासारखे दिसणारे गोळे आढळले.
Whale Fish Vomit
Whale Fish Vomitesakal
Updated on
Summary

इतक्या मोठ्या किमतीचा व्हेल माशाचा उलटीसदृश पदार्थ येथे सापडल्याने खळबळ उडाली आहे. त्यामुळे किनारी भागात हा विषय पुन्हा एकदा चर्चेत आला.

देवगड : जामसंडे तरवाडी भागात सुमारे एक कोटी रुपये किमतीचा व्हेल माशाची उलटीसदृश (Whale Vomit) पदार्थ पोलिसांनी हस्तगत केला. ओरोस येथील स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पथकाने (ता. ३०) रात्री ही कारवाई केली. याप्रकरणी संशयित म्हणून सुबोध रामचंद्र होडावडेकर (वय ५६) याच्यावर गुन्हा नोंदविण्यात आला आहे. सुमारे एक किलो वजनाचा हा पदार्थ आहे. घटनेची येथील पोलिस ठाण्यात (Devgad Police) नोंद केली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जामसंडे तरवाडी भागात व्हेल माशाची उलटीसदृश पदार्थ असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार ओरोस येथील स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पथकाने काल रात्री आठ वाजून ५० मिनिटांच्या सुमारास सापळा रचून संशयित वस्तू हस्तगत केली.

घटनास्थळी एका पिशवीमध्ये व्हेल माशाची उलटीसदृश पदार्थाचे लहान मेणासारखे दिसणारे गोळे आढळले. त्यांना एक विशिष्ट वास येत होता. पिशवीसह त्याचे वजन सुमारे एक किलो असल्याचे प्राथमिक तपासणीत आढळले. त्यानुसार त्याची किंमत सुमारे एक कोटी रुपये असल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. त्यानुसार पोलिसांनी गैरकायदा बिगरपरवाना वस्तू जवळ बाळगल्याप्रकरणी तसेच वन्यजीव संरक्षण अधिनियमातंर्गत एका संशयितावर कारवाई केली.

मोहिमेत स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलिस उपनिरीक्षक समीर भोसले, पोलिस उपनिरीक्षक रामचंद्र शेळके, सहायक पोलिस उपनिरीक्षक गुरुनाथ कोयंडे, पोलिस हवालदार आशिष जामदार, पोलिस हवालदार प्रमोद काळसेकर, पोलिस हवालदार किरण देसाई, महिला पोलिस हवालदार संतोषी गवस, पोलिस नाईक अमित पालकर, पोलिस नाईक अमित तेली, पोलिस काँस्टेबल जयेश सरमळकर, पोलिस काँस्टेबल यश अरमारकर आदींचा समावेश होता. अधिक तपास पोलिस हवालदार उदय शिरगांवकर करीत आहेत. दरम्यान, इतक्या मोठ्या किमतीचा व्हेल माशाचा उलटीसदृश पदार्थ येथे सापडल्याने खळबळ उडाली आहे. त्यामुळे किनारी भागात हा विषय पुन्हा एकदा चर्चेत आला.

तपासणी अहवाल आल्यावरच निश्‍चिती

आता सापडलेला व्हेल माशाची उलटीसदृश पदार्थ पोलिसांनी हस्तगत केला असून, तो तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात येणार आहे. त्यामुळे तपासणीचा अहवाल आल्यानंतरच आवश्यक निश्‍चिती होऊ शकेल, असे पोलिसांचे प्राथमिक मत होते.

अनेक प्रश्‍न अनुत्तरीत

व्हेल माशाची उलटीला परदेशात मागणी असते. यापासून सौंदर्यप्रसाधने, अत्तरे किंवा औषधे बनवली जातात. यापूर्वीही येथे व्हेल माशाची उलटीसदृश पदार्थ सापडण्याचे प्रकार घडले होते. तत्कालीन स्थितीत पोलिसांनी संशयितांवर कारवाईचा बडगा उगारला होता, मात्र त्यावेळी तपासणीसाठी पाठवलेल्या पदार्थाचे अहवाल काय आले, याची माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे अशाप्रकारच्या कारवाईचे पुढे काय होते, असा प्रश्‍न अनुत्तरित राहतो.

व्हेल माशाची उलटी सापडल्यानंतर त्याची किंमत कशाच्या आधारावर ठरवली जाते, खरंतर अशा सापडलेल्या वस्तुंची किंमत जाहीर करू नये, असे शासनाचे अध्यादेश आहेत. कारण अशा पदार्थांच्या किमती जाहीर केल्याने त्यामधील कुतूहल जागृत होऊन अशाप्रकारच्या गोष्टी करण्यास प्रोत्साहन मिळू शकते. त्यामुळे सर्वच बाबतीत काळजी घेणे आवश्यक ठरते.

-प्रा. नागेश दप्तरदार, मानद वन्यजीव संरक्षक, वनविभाग सिंधुदुर्ग

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()