रत्नागिरी : मुख्यमंत्र्यांबाबत (Chief Minister Uddhav Thackeray) आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने केंद्रीय मंत्री नारायण राणेंवर (Minister Narayan Rane) टीकेची झोड उठायला सुरुवात झालीय. यावर आज प्रतिक्रीया देताना त्यांचे पुत्र आमदार नितेश राणे (MLA Nitesh Rane) यांनी, नारायण राणे यांच्या वक्तव्याचं समर्थन करत ठाकरे सरकारवर (Thackeray Government) टीका केलीय.
सध्या राज्यात हिंसेसारखी परिस्थिती निर्माण झाली असून याला सरकारचं जबाबदार आहे.
नितेश राणे म्हणाले, सध्या महाराष्ट्रात राणे साहेबांच्या नेतृ्त्वात सुरु असलेल्या भाजपच्या जन आशीर्वाद यात्रेला (BJP Jan Ashirwad Yatra) नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे पंतप्रधान मोदींच्या आशीर्वादाने ही यात्रा मुंबई, रत्नागिरीत यशस्वीपणे दाखल झाली. त्याला प्रचंड प्रतिसादही मिळाला. सध्या सरकारविषयी जनतेमध्ये रोष पहायला मिळत असून राणेंवर चुकीच्या पध्दतीने आरोप करण्याचं काम ह्या सरकारकडून केलंय जातंय. आज मुंबईतील आमच्या घरात कोणी नसताना शिवसैनिकांनी जो काही राडा केला, तो निषेधार्ह आहे. जर ठाकरेंचे नातेवाईकच कायदा हातात घेऊन मुंबई पोलिसांना आई-बहिणीवर शिव्या देत असतील, तर आपल्या महाराष्ट्राचा पश्चिम बंगाल (West Bengal) झाल्याशिवाय राहणार नाही, असं त्यांनी एका खासगी वृत्तवाहिनीशी बोलताना म्हटलं आहे.
सध्या राज्यात हिंसेसारखी परिस्थिती निर्माण झाली असून याला सरकारचं जबाबदार आहे. त्यामुळे राणे साहेबांनी मुख्यमंत्र्यांबद्दल केलेलं वक्तव्य मला चुकीचं वाटतं नाही. माझ्या अधिकाऱ्यांना सरकारला विचारावं लागतंय, की हा अमृतमहोत्सव आहे, की हिरकमहोत्सव, मग राणेंचं वक्तव्य बेतालं कसं? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. या सगळ्या प्रकाराबाबत राणे साहेबांच्या माध्यमातून केंद्राकडे माहिती दिली जाणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या नातेवाईकांनी कायदा हातात घेतला आहे, मग त्यांच्यावर कधी देशद्रोहाचा गुन्हा दाखल करणार? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.