भाजपच्या हातीच पुन्हा सत्ता : विनायक राणेंचा दावा

गेली पाच वर्ष आमच्या नगरसेवकांनी पारदर्शी कारभार केला आहे. कुडाळच्या विकासासाठी विविध उपक्रम राबविले. भविष्यात अशाच प्रकारचे विकासाचे व्हिजन असणार आहे.
Vinayak Rane
Vinayak RaneSakal
Updated on
Summary

गेली पाच वर्ष आमच्या नगरसेवकांनी पारदर्शी कारभार केला आहे. कुडाळच्या विकासासाठी विविध उपक्रम राबविले. भविष्यात अशाच प्रकारचे विकासाचे व्हिजन असणार आहे.

कुडाळ - विकासाची वलग्ना करणाऱ्या शिवसेनेला (Shivsena) मतदार घरी बसवून कुडाळचा (Kudal) नियोजनबद्ध गतिमान विकास करण्यासाठी भाजपच्या (BJP) हातात पुन्हा सत्ता देतील, असा दावा निवडणुकीची जबाबदारी दिलेले भाजप कुडाळ तालुकाध्यक्ष विनायक राणे, (Vinayak Rane) कुडाळ शहर अध्यक्ष राकेश कांदे यांनी सांगितले.

येथील नगरपंचायत निवडणूक अनुषंगाने श्री. कांदे यांनी भाजप कार्यालयात पत्रकार घेतली. यावेळी माजी नगराध्यक्ष तेली, माजी नगराध्यक्ष व कुडाळ तालुका अध्यक्ष राणे, दादा साईल, रुपेश कानडे, देवेंद्र सामंत आदी उपस्थित होते. श्री. कांदे म्हणाले, "माजी नगराध्यक्ष तेली, राणे व सत्ताधारी नगरसेवक यांच्या माध्यमातून कुडाळचा सर्वांगीण विकास झाला आहे. आम्ही केलेला विकास हा नागरिकांच्या नजरेसमोर आहे. कुडाळमध्ये झालेली दर्जेदार कामे ही आमच्या सर्व उमेदवाराना 100 टक्के विजयी करून पुन्हा कुडाळ शहर विकासाच्या बाबतीत गतिमान करण्यासाठी आमच्या हातात सत्ता देणार आहेत. शिवसेनेचे खासदार, आमदार कुडाळच्या विकासात निष्क्रिय ठरले आहे.

गेली पाच वर्ष आमच्या नगरसेवकांनी पारदर्शी कारभार केला आहे. कुडाळच्या विकासासाठी विविध उपक्रम राबविले. भविष्यात अशाच प्रकारचे विकासाचे व्हिजन असणार आहे. आमदार नाईक यांनी कुडाळ तालुक्याचे स्वरूप खड्डेमय केले आहे. कुडाळ शहरात नवीन उभारलेले बसस्थानक हे गोठा आहे की बसस्थानक? हा सर्वानाच प्रश्न पडला आहे. पूर्वीचे बसस्थानक खूप चांगले होते. त्याचेच नूतनीकरण केले असते तर कुडाळच्या विकासात भर पडली असती. आमदार, खासदार यांनी कोणताच विकास केला नसल्यामुळे ते आता सत्ताधाऱ्यांना बदनाम करण्याच्या दृष्टीकोनातून काम करत आहेत. त्यांच्या भूलथापांना मतदार बळी पडणार नाही. गेली पाच वर्षे पारदर्शक कारभार केल्यामुळेच सत्तास्थानी पुन्हा आम्हीच बसणार आहोत."

Vinayak Rane
'दापोली'च्या विद्यार्थ्यांचा धमाका; लाठीकाठी स्पर्धेमध्ये मिळविली 59 पदके

कांदे पुढे म्हणाले, "शिवसेनेने कुडाळ शहरात एकही लक्षणिय असे काम केलेले नाही. शिवसेनेची राज्यात सत्ता असताना कुडाळ भंगसाळ बंधार्‍यावर बांधलेल्या बंधार्‍याला गळती लागती. आरएसएन हॉटेल समोरील रस्त्याचे भुमिपुजन झाले; पण मोजणीसाठी खात्याकडे पैसेच नव्हते अशी भयावह स्थिती सत्तेत असलेल्या शिवसेनेची असताना शिवसेना कुडाळ शहराचा विकास काय करणार?"

त्यांनी वृत्तपत्रातील कात्रणे दाखवली. कुडाळ शहरातील बसस्थानक, स्मशानभुमीची संरक्षक भिंत या कामावरही त्यांनी बोट ठेवले. सध्या शिवसेना-राष्ट्रवादी युती आहे. नगरपंचायतची इमारत गळकी आहे. त्या इमारतीचे काम ठेकेदारच्या नावावर कोण करत होते? हे जनतेला ज्ञात आहे. कुडाळ शहरातील संजय पडते, काका कुडाळकर हे जिल्हा परिषद अध्यक्ष होते. सुनिल भोगटे उपसभापती सभापती होते. संजय भोगटे जिल्हा परिषद सदस्य होते व त्यांचे अन्य काही नातेवाईक वेगवेगळ्या पदावर असताना त्यांनी कुडाळच्या विकासासाठी काय दिवे लावले? हे जनतेला ज्ञात आहे. शिवसेनेची राजकीय दुकानदारी भाजपचे माजी नगराध्यक्ष तेली व राणे यांनी बंद केल्यामुळेच ते भाजवर आरोप करत आहेत. या आरोपांचा भाजपवर कोणताही परिणाम होणार नसून कुडाळ नरपंचायतच्या सर्व जागांवर भाजप विजयी होईल असा विश्वास व्यक्त केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.