आघाडी सरकारचा पापाचा घडा भरला ;BJP एकहाती निवडणुका जिंकेल

वसुली, भ्रष्टाचारी आणि महिलांवर अत्याचार सहन करणारे सरकार आहे.
Arun Lad
Arun LadEsakal
Updated on

रत्नागिरी : राज्यातले महाविकास आघाडी सरकार कधीही पडू शकते. सरकार पडले तर आम्ही मध्यावधी निवडणुकांना सामोरे जाऊ. जनतेच्या मनातले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच (Devendra Fadnavis)आहेत. भाजपा एकहाती निवडणुका जिंकेल, असा दावा भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष, आमदार प्रसाद लाड (Prasad Lad) यांनी पत्रकार परिषदेत केला. गेल्या तीन-चार दिवसांत दिल्लीतील घडामोडी तसेच सरकार पडण्याच्या मंत्र्यांच्या वक्तव्यांनंतर आता लाड यांनी हे विधान केले.

भाजपा जिल्हा कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते म्हणाले की, हे वसुली, भ्रष्टाचारी आणि महिलांवर अत्याचार सहन करणारे सरकार आहे. भ्रष्टाचाराच्या, गैरवर्तनाच्या आरोप असलेल्या मंत्र्यांना पाठीशी घालणाऱ्या आणि शेतकरी, एसटी कर्मचारी, एमपीएससीचे विद्यार्थी अशा अनेक समाजघटकांच्या न्याय्य मागण्यांकडे दुर्लक्ष करणाऱ्या गेंड्याच्या कातडीच्या महाविकास आघाडी सरकारचा पापाचा घडा भरला आहेत. अशा कुचकामी, बिनकामाच्या सरकारचा जनता जनार्दनच योग्य वेळी निकाल लावेल.

Summary

भ्रष्ट मंत्र्यांचं ओझं वाहणारं अत्यंत अकार्यक्षम, बेपर्वा सरकार असे आघाडी सरकारचं वर्णन करावं लागेल.

लाड यांनी सांगितले की, भ्रष्ट मंत्र्यांचं ओझं वाहणारं अत्यंत अकार्यक्षम, बेपर्वा सरकार असे आघाडी सरकारचं वर्णन करावं लागेल. गृहमंत्रिपद भूषवणाऱ्या मंत्र्याला पोलिस अधिकाऱ्यानेच १०० कोटी वसुलीचा आरोप झाल्यानंतर राजीनामा देणे भाग पडले. दुसऱ्या मंत्र्याला तरुणीच्या आत्म्यहत्येला जबाबदार असल्याचा आरोप झाल्याने मंत्रीपद सोडणे भाग पडले.

पत्रकार परिषदेला जिल्हाध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन, जिल्हा प्रभारी, माजी आमदार प्रमोद जठार, जिल्हा सरचिटणीस सचिन वहाळकर, अॅड. विलास पाटणे तालुकाध्यक्ष मुन्ना चवंडे, जिल्हा प्रसिद्धीप्रमुख उमेश कुळकर्णी आदी उपस्थित होते.

आदित्य ठाकरेंचे बालहट्ट पुरवताहेत

आरे कारशेडला हरित लवाद, सर्वोच्च न्यायालयाची मान्यता असताना आदित्य ठाकरेंच्या बालहट्टापायी विरोध करण्यात आला. २७ हजार झाडांची कत्तल थांबवल्याचे सांगणाऱ्या ठाकरे सरकारने बिल्डर धार्जिणे धोरण आखत ३६ हजार झाडे तोडली. बालहट्ट पुरवणारे हे सरकार असल्याची टीका आमदार प्रसाद लाड यांनी केली.

एसटी संपाला भाजपचा पाठिंबा

एसटी कर्मचाऱ्यांच्या एसटी संपाला भाजपाचा पाठिंबा आहे. कार्यकारिणीतच ठराव मंजूर केला आहे. समितीचा अहवाल येईपर्यंत आम्ही थांबायला तयार होतो. परंतु परिवहन मंत्र्यांनी शरद पवारांच्या सांगण्यावरून वेतनवाढ जाहीर केली. यामुळे कर्मचारी संतापले आहेत. विलिनीकरणाच्या मागणीवर आम्ही ठाम आहोत, असे आमदार लाड यांनी स्पष्टपणे सांगितले.

Arun Lad
‘KDC’ च्या नऊ जागांवर निवडणूक लागणार ; हसन मुश्रीफांचा दावा

परब यांचे रिसॉर्ट अनधिकृतच

जिल्ह्याचे पालकमंत्री अनिल परब यांचे रिसॉर्ट अनधिकृत असल्याचे चार महिन्यांपूर्वीच सिद्ध झाले आहे. त्यामुळे ते पाडण्याबाबत जिल्हाधिकारी व संबंधित यंत्रणा दुर्लक्ष करत आहे. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना भेटणार असल्याचे आमदार लाड यांनी सांगितले.

जिल्हा बॅंकेत भाजपचे स्थान

जिल्हा बॅंक निवडणुकीतील भाजपच्या समावेशाबद्दल प्रश्न विचारला असता, या निवडणूका सहकार पॅनेल म्हणून लढवल्या जातात. त्यात सर्वच राजकीय पक्ष एकत्र येतात. जिल्हा बॅंकेत भाजपचे स्थान आहे, ही चांगली गोष्ट आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.