खासदारांना गाळातले कळतच नाही; आमदार लाड यांची टीका

आता चिपळूणकरांना न्याय मिळवून दिल्याशिवाय गप्प राहणार नाही
politics
politicsesakal
Updated on

चिपळूण : खासदारांना गाळातले काही कळतच नाही. आमदार भास्कर जाधवांचे (Bhasakarrao jadahv) नेटवर्क बैठकीपर्यंत पोहोचत नाही. यामुळेच चिपळूणकरांना न्याय मिळण्यासाठी अधिवेशनात भाजपच्यावतीने आवाज उठवून न्याय मिळण्यासाठी प्रयत्न करू, चिपळूणकरांच्या आंदोलनात भाजपाने (BJP) उडी घेतली आहे. आता चिपळूणकरांना न्याय मिळवून दिल्याशिवाय गप्प राहणार नाही, असे आश्वासन आमदार प्रसाद लाड (Prasad lad) यांनी येथे दिले.

चिपळूण (Chiplun) बचाव समितीच्या माध्यमातून सुरू असलेल्या साखळी उपोषणाच्या ११ व्या दिवशी आमदार प्रसाद लाड यांनी भेट दिली. उपोषणाकर्त्यांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर या विरोधात आवाज उठवण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर कापसाळ विश्रामगृह येथे आमदार लाड यांनी पत्रकारांशी संवाद साधताना लाड म्हणाले, वाशिष्ठी (vashisthi river) आणि शिवनदीतील गाळ काढण्याची चिपळूणवासीयांची मागणी रास्त आहे. वाशिष्ठी नदीत ३ लाख ३० हजार घनमीटर गाळ काढण्याची आवश्यकता आहे; मात्र प्रशासकीय अधिकारी कागदोपत्री ७० हजार घनमीटर गाळ असल्याचे सांगतात.

politics
सेनेत अखेर बंड; शिवसेना-राष्ट्रवादी समीकरण अमान्य

शिवसेनेचे प्राबल्य आहे, तिथे अन्याय..

प्रसाद लाड पुढे म्हणाले, शासकीय विभागात एकमेकांच्यात ताळमेळ नाही. कोणाचा कोणाला पत्ता नाही. गाळ काढण्यासाठी ३०० कोटींची मागणी असताना केवळ १० कोटीचा निधी मंजूर होतो. ही लांच्छनास्पद बाब आहे. जिथे जिथे शिवसेनेचे प्राबल्य आहे, तिथे तिथे लोकांवर अन्याय होत आहे. येत्या ५ महिन्यांत दोन्ही नद्यांतील गाळ न काढल्यास पुन्हा चिपळुणात पूरपरिस्थिती निर्माण होण्यास वेळ लागणार नाही.

पालकमंत्री फिरकले नाही

२२ जुलैच्या महापुरात उद्ध्वस्थ झालेल्या चिपळूण शहर व परिसरात पूरमुक्तीच्या उपाययोजना राबवण्यात शासनाला रस नाही. गाळ काढण्यासाठी केवळ १० कोटीच गाजर दाखवून चिपळूणकरांच्या तोंडाला पाने पुसली आहेत. गाळाविषयी सरकार गंभीरतेने दखल घेत नाही. पालकमंत्री जिल्ह्यात देवदर्शन घेतात; मात्र त्यांना उपोषणाचे काही देणे-घेणे नाही. दोन दिवस त्यांनी उपोषणाला भेट देण्याचे टाळले आहे.

politics
शिवसेना नेते रामदास कदम अन् आमदार योगेश कदमांना मोठा धक्का

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.