भाज्यांनी ओलांडली शंभरी! टोमॅटो, कांदा साठीच्या घरात; दरवाढीमुळे ग्राहकांना सोसावा लागतोय आर्थिक भुर्दंड

Vegetables Rate Today : दरवाढीमुळे ग्राहकांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे.
Vegetables Rate Today
Vegetables Rate Today esakal
Updated on
Summary

पावसामुळे पिकाचे नुकसान झाल्याने जिल्ह्यात भाजीपाला आवक मंदावली आहे. त्यातच सणवार असल्यामुळे भाज्यांना मागणी वाढली आहे.

रत्नागिरी : नवरात्रोत्सवात (Navratri Festival) घरोघरी होणाऱ्‍या उद्यापने आणि व्रतवैकल्यामुळे शाकाहाराला अधिक पसंती आहे. भाज्यांना (Vegetables) मागणी वाढल्यामुळे दर वधारले आहेत. बहुतांश भाज्यांनी शंभरी ओलांडली असून, टोमॅटो व कांद्याची साठी तर बटाट्यानींही पन्नाशी पार केली आहे.

दरवाढीमुळे ग्राहकांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. जिल्ह्यात गुरूवारपासून नवरात्रोत्सवाला प्रारंभ झाला आहे. या दिवसात सात्विक शाकाहार घेतला जातो. यामुळे या दिवसात भाज्यांना मागणी वाढते; मात्र, पावसामुळे पिकाचे नुकसान झाल्याने जिल्ह्यात भाजीपाला आवक मंदावली आहे. त्यातच सणवार असल्यामुळे भाज्यांना मागणी वाढली आहे. त्यामुळे दरवाढ झाली असल्याचे सांगण्यात येते.

Vegetables Rate Today
छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या शिवकालीन गढीला मिळणार पुन्हा झळाळी; ऐतिहासिक ठेव्याचे पालटणार रूप

टोमॅटो, हिरवी मिरची, कोबी, वांगी, फ्लॉवर, पावटा, गाजर, घेवडा, फरस बी, गवार, सिमला मिरचीसह मुळा, माठ, पालक, शेपू, मेथी या पालेभाज्यांचीही वाढ झाली आहे. बाजारात नवीन बटाट्याची आवक होत असून, ४० रुपये किलो दराने विक्री सुरू आहे. लसणाचे दर अद्याप तेजीतच आहेत. लसूणबरोबरच कांद्यानेही दरात पुन्हा उसळी घेतली असून, २४० ते ३२० रुपये किलो दराने लसणाची विक्री सुरू आहे. कांदा पन्नाशी गाठण्याच्या तयारीत आहे. काही भागात ओला कांदा ३५ ते ४० रुपये दराने विकला जात आहे.

काद्यांचे दर वाढले

पावसाचे दिवस असल्यामुळे गृहिणींचा सुका साठवणुकीचा कांदा घेण्याकडे कल आहे; मात्र काद्यांचे दर वाढले असल्याने तूर्तास किरकोळ खरेदी करून समाधान मानावे लागत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.