शिरगाव आरोग्य केंद्रात पूर्ण वेळ अधिकारी द्या

शिरगाव आरोग्य केंद्रात पूर्ण वेळ अधिकारी द्या

Published on

१८ (टूडे ३ साठी)


- rat२२p९.jpg-
२४M८५१२२
चिपळूण : शिरगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील समस्यांबाबत जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांशी चर्चा करताना ग्रामस्थ

शिरगाव आरोग्य केंद्रात अधिकारी द्या

ग्रामस्थांची मागणी ; जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांशी चर्चा

सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. २२ : शिरगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी द्या अशी मागणी येथील ग्रामस्थांनी रत्नागिरी जिल्हा परिषदचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये यांच्याकडे केली आहे.
शिरगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शिरगावसह पोफळी, अलोरे, कुंभार्ली, कोंडफणसवणे, तळसर, मुंडे या भागातील सामान्य ग्रामस्थ औषधोपचार करता येतात. इतर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या तुलनेत शिरगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी येणाऱ्या ग्रामस्थांची संख्या लक्षणीय आहे. मात्र येथे पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी नाही. त्यामुळे ग्रामस्थांना त्रास सहन करावा लागत आहे. येथे दोन वैद्यकीय अधिकाऱ्यांची नेमणूक आहे परंतु यातील एक महिला अधिकारी प्रसुतीच्या रजेवर आहे. दुसरे डॉक्टर तालुक्याच्या ठिकाणी किंवा इतर कामासाठी गेले तर ग्रामस्थांवर उपचार कोण करणार असा प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे पूर्ण वेळ चांगला अधिकारी मिळावा, अशी येथील ग्रामस्थांनी जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांकडे मागणी केली आहे. येथील ग्रामस्थ सुरज शिंदे, जितेन्द्रराव शिंदे, प्रदीप शिंदे, राजेश सावंत, संतोष नाचरे, धनंजय सोलकर यांनी जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांची भेट घेतली. शिरगावच्या आरोग्य केंद्रात औषधांचा पुरवठा वेळेवर व्हावा. रिक्त पदे तातडीने भरण्यात यावी. आरोग्य केंद्रातील पाण्याचा आणि इतर समस्या मार्गी लावाव्यात अशी मागणी या वेळी करण्यात आली. जिल्हा आरोग्य अधिकाऱ्‍यांनी ग्रामस्थांच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत लवकरच त्या पूर्ण करण्याचे आश्वासन दिले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.