रायगड जिल्ह्यातील धाटाव MIDC मध्ये असलेल्या एका केमिकल कंपनीमध्ये भीषण स्फोट झाला असून, यामध्ये 3 कामगारांचा मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार हा स्फोट इतका भीषण होता की, याचा आवाज परिसरात एक किलोमीटर लांबपर्यंत ऐकू गेला. यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
दरम्यान आता घटनास्थळी अग्निशमन यंत्रणा दाखल झाली असून, त्यांनी बचाव कार्याला सुरुवात केली आहे.