Raigad : खालापुरात धनुर्वाताचे संकट,लशींचा तुटवडा; सर्पदंश झालेल्‍या महिलेची परवड

पचारादरम्‍यान आवश्यक धनुर्वाताचे इंजेक्शन उपलब्ध नसल्याने चौक ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले.
Raigad
RaigadSakal
Updated on

Raigad - धनुर्वाताचे इंजेक्शन उपलब्ध नसल्याने सर्पदंश झालेल्या तीसवर्षीय महिलेला उपचारासाठी चौक ग्रामीण रुग्णालयात हलवण्याची वेळ आली. त्‍यामुळे नातेवाईकांनी संताप व्यक्त केला.

तालुक्यातील आरोग्य केंद्रात तीन महिन्यांपासून धनुर्वात लशीचा पुरवठा बंद आहे. पावसाळ्यात विविध साथीचे आजार बळावतात. त्‍यांना प्रतिबंध म्हणून लसीकरणावर भर दिला जातो, मात्र प्राथमिक आरोग्य केंद्रात सध्या धनुर्वात लशीचा तुटवडा जाणवत आहे.

Raigad
Pune News : नैराश्यातून ३२ वर्षीय तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

बुधवारी पहाटे सावरोली गावात राहणाऱ्या नेहा देवीसिंग या महिलेला सर्पदंश झाल्‍याने तातडीने खालापूर प्राथमिक आरोग्य केंद्रात आणण्यात आले होते. मात्र उपचारादरम्‍यान आवश्यक धनुर्वाताचे इंजेक्शन उपलब्ध नसल्याने चौक ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले. सुदैवाने चौक येथे योग्य उपचार मिळाल्याने नेहाचा जीव वाचला. मात्र उपचारासाठी झालेली धावपळीमुळे रुग्‍णाची प्रकृती गंभीर झाली असती तर जबाबदार कोण, असा

प्रश्‍न नातेवाईकांनी उपस्‍थित केला. पावसाळा सुरू होताच आरोग्‍य केंद्रात धनुर्वाताची लस घेणाऱ्यांची संख्या वाढली आहे.

सर्पदंशाच्या घटना वाढत असून शहरातील प्राथमिक आरोग्‍य केंद्रात धनुर्वाताची लस नसल्‍याने नागरिकांना खासगी रुग्‍णांलयांत जावे लागत आहे.

Raigad
Mumbai Crime : कॉलगर्ल घरी येत नाही म्हणून केली शिवीगाळ; 42 वर्षीय व्यक्तीची गळा चिरुन हत्या

लोहपमध्ये तीन महिन्यात ४५० जणांनी घेतली लस

१ खालापूर तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उपकेंद्र मिळून महिन्याला जवळपास हजारच्या आसपास धनुर्वाताच्या इंजेक्शनची गरज भासते. परंतु जिल्हा आरोग्य विभागाकडून पुरवठा होत नसल्याने रुग्‍णांना लस विकत घ्‍यावी लागते.

२ लोहप प्राथमिक आरोग्य केंद्रात तीन महिन्यात जवळपास साडेचारशे जणांनी धनुर्वात लस घेतली आहे. केंद्राच्या फंडातून बाहेरून लस खरेदी करण्यात आली आहे.

३ सर्वच आरोग्य केंद्रात हीच परिस्थिती असून खालापूर प्राथमिक आरोग्य केंद्रात तर श्वान दंशवरीलही लस नसल्याने रुग्णांना चौक येथील ग्रामीण रुग्णालय गाठावे लागते.

४पावसाळ्यात सर्पदंश, विंचूदंश यासारख्या घटनांमध्ये वाढ होते. याशिवाय गर्भवती महिला, अपघाताग्रस्‍तांना धनुर्वाताचे इंजेक्‍शन दिले जाते. आरोग्य केंद्रात मनुष्‍यबळाबरोबरच औषधांचा तुटवडा जाणवत असल्‍याने आंदोलनाचा इशारा ग्रामस्‍थांकडून देण्यात आला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.