रायगडाला संवर्धनातून येणार जाग; ३५० वास्तूंना उजाळा

छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची राजधानी असलेल्या रायगडाचे सध्या संवर्धन सुरू आहे.
Raigad Fort
Raigad FortSakal
Updated on

महाड, (जि.रायगड) : छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची राजधानी असलेल्या रायगडाचे सध्या संवर्धन सुरू आहे. या कामादरम्यान शिवरायांचा पराक्रम अन् ऐतिहासिक ठेव्याबरोबरच त्या काळातील संस्कृती हळूहळू उजेडात येत आहे. उत्खननाच्या कामातून गडाचे अनेक पैलू समोर येणार आहेत. गडाला गतवैभवही मिळणार आहे. रायगड किल्ल्याच्या वास्तूंचे हवाई सर्वेक्षण करण्यात आले असून त्याद्वारे गडावरील सुमारे ३५० वास्तूंची माहिती समोर येत आहे. (Raigad Fort Development Updates)

रायगडाला रायरी, नंदादीप, शिवलंका, राहीर, पूर्वेकडील जिब्राल्टर आदी नावे होती. मेघडंबरी, खुबलढा बुरूज, नाणेदरवाजा, महादरवाजा, हत्ती तलाव, गंगासागर तलाव, पालखी दरवाजा, मेणा दरवाजा, राज सदर, रत्नशाळा, राजभवन, बाजारपेठ, नगारखाना, शिकाई मंदिर, जगदीश्वर मंदिर, छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी आदी ठिकाणे पाहण्यासाठी शिवप्रेमी मोठ्या संख्येने येतात.

स्वराज्याची राजधानी असणाऱ्या रायगडावर येणारे शिवप्रेमी किल्ल्याची दुरवस्था पाहून दुःख व्यक्त करत होते. राजधानीला गतवैभव मिळावे अशी त्यांची मागणी होती. त्यानुसार रायगड संवर्धनाचे काम हाती घेण्यात आले. त्यासाठी ६०७ कोटी रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला. त्या माध्यमातून गडावर अनेक कामे सुरू आहेत. पुरातत्त्व संशोधन विभाग हे काम करत असून अनेक दुर्लभ माहिती यातूनच शिवप्रेमींना आगामी काळात मिळणार आहे.

रायगड किल्ल्यावरील वास्तूंचे हवाई सर्वेक्षण करण्यात आले आहे. त्याद्वारे गडावरील सुमारे साडेतीनशे वास्तूंची माहिती समोर येत आहे. राजवाडे व परिसरात उत्खनन केले जाणार आहे. राजसदरेवर उभे राहिले की समोरच दिसणारे अष्टप्रधान मंडळाचे वाडे, बाजूला असणारा राणीवसा या ठिकाणी आता उत्खननाचे काम सुरू झाले आहे.

२५ टाक्यांची स्वच्छता

संवर्धनातून रायगडावर जाणाऱ्या पायऱ्यांची दुरुस्ती झाली आहे. रोप-वेपासून पुढे जाणारी मार्गिकाही तयार करण्यात आली आहे. सध्या गडावर येणाऱ्या पर्यटकांना पाणीटंचाई भासत असली, तरी त्या काळात पाण्याचा मुबलक साठा होता. गडावर लहान-मोठ्या ८४ पाण्याच्या टाक्या आहेत. त्यातील सुमारे २५ टाक्यांची स्वच्छता करण्यात आली आहे. हत्ती तलावाची गळती काढल्यानंतर तिथेही आता पाणी साठू लागले आहे. रायगडावरील बुरूज, तटबंदी, वास्तू आदींचे जतन केले जात आहे.

प्रगतिपथावरील कामे

  • महादरवाजाला ऐतिहासिक स्वरूप पुन्हा देण्यात आले

  • गडावर पालखी जाण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या नाणेदरवाजाला गतवैभव देण्याचे काम सुरू

  • गडावरील नगारखाना, जगदीश्वर मंदिराचे ‘केमिकल वॉश’ काम पूर्ण

  • ऐतिहासिक वास्तूंचे संवर्धन, राजदरबार, नगारखाना, जगदीश्वर मंदिर आदींची कामे सुरू

  • गडावरील दरवाजांची पुनर्बांधणी, तटबंदी सुधारणा

  • पर्यटकांसाठी पाणीपुरवठा योजना, वृक्ष लागवड

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.