Raigad : सामाजिक भान जपणारे गुरुवर्य, चाकोरीबाहेर जात उमटवला ठसा; ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी प्रेरणास्रोत

ज्या ठिकाणी शाळा नव्हती, अशा रोहा तालुक्यातील दुर्गम भागातील चिंचवलीतर्फे आतोणे शाळेत २०१९ मध्ये त्यांनी विनंती बदली घेतली.
Teacher
Teacheresakal
Updated on

ग्रामीण भागात शिक्षकी सेवा बजावत असताना चाकोरीबाहेर जात रायगड जिल्ह्यातील अनेक शिक्षकांनी आपला वेगळा ठसा उमटवला आहे. पाच सप्टेंबरला शिक्षक दिनी अशा शिक्षकांच्या कामाची घेतलेली दखल.

आदिवासी मुलांना बोलीभाषेतून शिक्षण

मराठवाड्यातील दुष्काळी भागात शेतीला पर्याय नसल्याने डीएडचे शिक्षण पूर्ण करून २००६ मध्ये रायगड जिल्हा परिषदेत शिक्षक म्हणून रुजू झालेले गजानन जाधव यांनी अल्‍पावधीतच आदिवासी मुलांसाठी बोलीभाषेशी नाळ जोडणारा शिक्षक अशी ओळख निर्माण केली आहे. १७ वर्ष कातकरी आदिवासी मुलांच्या शिक्षणासाठी ते झटत आहेत.

ज्या ठिकाणी शाळा नव्हती, अशा रोहा तालुक्यातील दुर्गम भागातील चिंचवलीतर्फे आतोणे शाळेत २०१९ मध्ये त्यांनी विनंती बदली घेतली. कधी मंदिरात तर कधी माळरानावर शाळा भरून त्यांनी आदिवासी मुलांना शिक्षक दिले. कोरोना काळात झोपडपट्टी, वीटभट्टीवर जाऊन ते मुलांना शिकवायचे. आदिवासी मुलांना शिकवताना भाषेची मुख्य अडचण येत असल्याने त्‍यांनी त्‍यांची भाषा शिकून घेतली.

Teacher
Mumbai Crime : 23 वर्षीय हवाई सुंदरीच्या हत्या प्रकरणाचा उलगडा; आरोपी सफाई कर्मचारी...

त्‍यांनी बोली भाषेतून शिक्षण देण्यास सुरुवात केली. इतकेच नव्हे तर कातकरी भाषेत शिक्षण देणारे पुस्तकही लिहिले. आज कातकरी भागातील सुमारे बाराशे शाळांमध्ये त्यांच्या पुस्तकाचा अध्यापनासाठी उपयोग होत आहे. २०२२ मध्ये मुलांची व शिक्षकांची इच्छाशक्ती पाहून एका खासगी कंपनीने वाडीत मोठी शाळा बांधून दिली. २०१९ मध्ये ५७ पट संख्या असलेल्या शाळेत आज ११७ विद्यार्थी शिक्षण घेतात. पहिली ते चौथीपर्यंत असलेली शाळा आता सातवीपर्यंत झाली आहे.

शिष्‍यवृत्ती परीक्षेत मोलाचे मार्गदर्शन

महाड तालुक्यातील वीर सुतारवाडी शाळेत कार्यरत संभाजी खोत यांनीही आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. स्पर्धात्मक युगात विद्यार्थी टिकले पाहिजेत यासाठी शिष्यवृत्ती परीक्षा, एमटीएस, आणि नवोदय परीक्षा परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांना बसवून त्यांची विशेष तयारी करून घेण्याकडे त्यांचा कल आहे.

त्यामुळेच दरवर्षी शंभर टक्के निकाल देत ते विविध भागातील मुलांना स्पर्धात्मक परीक्षांसाठी तयार करत आहेत. ज्या शाळेमध्ये त्यांनी सेवा बजावली तेथील पटसंख्या कायम वाढतच आहे. शाळेत गुणवत्ता असल्याने अनेक सेवाभावी संस्था दानशूर व्यक्तीकडून शाळेला व विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत मिळवण्यासाठी ते भरपूर प्रयत्न करीत आहेत.

Teacher
Mumbai Viral Video: मुंबईत दुचाकीवर 2 बकऱ्यांसह दोघांचा धोकादायक प्रवास, नेटकऱ्यांची कारवाईची मागणी

कला रसिकांना चित्रांतून भुरळ

गोरेगाव येथील ना.म. जोशी विद्यालयातील आदेश सुतार यांच्यात एक दर्जेदार चित्रकार दडला आहे. त्यांनी काढलेली अप्रतिम चित्रे अनेकांना भुरळ पाडतात. पेन्सिल स्केच, लँडस्केप, पोट्रेट, फिगर पेंटिंग अशा विविध प्रकारांमध्ये ते चित्र काढतात. एखाद्या व्यक्तीला समोर बसवून त्यांचे हुबेहूब चित्र रेखाटण्याची कला त्यांना अवगत आहे.

पनवेल, मुंबई तसेच गोरेगाव अशा ठिकाणी त्यांची चित्र प्रदर्शने झाली आहे. या प्रदर्शनात त्यांनी काढलेल्या चित्रांची पसंती मिळून विक्रीही झाली आहे. जे जे स्कूल ऑफ आर्टचा सुषमा जैन पुरस्‍कारही त्यांना मिळाला आहे. चित्रकलेचा वारसा जपला जावा, यासाठी विद्यार्‍थ्‍यांनाही मार्गदर्शन करीत आहेत.

पोवाड्यातून जपला ऐतिहासिक वारसा

महाडमधील चांभार खिंड शाळेमध्ये कार्यरत असणारे व २५ वर्षे शिक्षण सेवेत असलेले संजय घाडगे यांनी संगीत आणि गायन क्षेत्रात आपला ठसा उमटवला आहे. २००५ पासून विविध ठिकाणी संगीताचे कार्यक्रम ते सादर करतात. छत्रपती शिवरायांवर ऐतिहासिक पोवाडे, अभंग, विविध गाणी गात, कवितांना चाल देणे आदी माध्यमातून त्यांनी आपली संगीत कला जोपासली आहे.

त्यांच्या कामाची दखल घेत रायगड भूषण आणि प्रल्हाद शिंदे पुरस्काराने त्‍यांना सन्मानित करण्यात आले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांवर त्‍यांनी गात असलेल्या पोवाड्यांची दखल शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी दखल घेत त्यांना प्रशस्तपत्र देऊन गौरवले आहे. शाळेमधील विविध कार्यक्रम, सरकारी कार्यक्रमातही संजय घाडगे यांचे स्वागत गीत नाहीतर एखादा पोवाडा आवर्जून सादर केला जातो.

Teacher
Mumbai Crime : अट्टल फरार इराणी दुचाकी चोरट्या ला पोलिसांनी केली अटक

स्‍वच्छता अभियानात गीतलेखन

कोतुर्डे शाळेतील तुकाराम माने हेही गीत लेखनाचे काम करतात. आदर्शनगर आदिवासी वाडीमध्ये शिक्षक म्हणून काम करताना त्यांनी आदिवासी मुलांना अंघोळ घालण्यापासून केस कापण्याचे काम केले आहे.

स्वच्छता अभियानामध्ये त्यांचा मोठा सहभाग आहे. रायगड जिल्हा परिषदेच्या स्वच्छता अभियानामध्ये त्यांनी अनेक स्वच्छता गीते लिहिली आहेत. जिल्हा परिषदेकडून या गीतांचे पुस्तकही प्रकाशित झाले. ते सातत्‍याने विविध प्रकारचे करतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.