Raigad : पावसाचे थैमान अन् गणेशमूर्तींचे नुकसान, पेणमध्ये मूर्तिकार हवालदिल

मुसळधार पावसामुळे निडवली गावातील रोहिदास पांडू पवार व आघई येथील रामा चौधरी यांच्या घराचे नुकसान झाले.
Raigad
RaigadSakal
Updated on

वडखळ - तालुक्यात पावसाने थैमान घातले असून सखल भागांतील घरे, दुकानांत पाणी शिरले. हमरापूर, जोहे, कळवे विभागातील अनेक गणेशमूर्ती कारखान्यांमध्ये पावसाचे पाणी शिरल्याने लाखोंचे नुकसान झाल्‍याने मूर्तिकारांवर संकट ओढावले आहे.

Raigad
Mumbai Rain Alert : मुंबईला येलो अलर्ट! ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरीत पुढील तीन तासांत मुसळधार पावसाची शक्यता

भोगावती नदी दुथडी भरून वाहत असून भुंडा पुल पाण्याखाली गेल्‍याने दादर, उर्णोली, सोनखार, कळवे, जोहे, तांबडशेत, रावे, खरोशी, बळवली या गावांचा संपर्क तुटला. अंतोरे, दुरशेत, खरोशी व तांबटशेत गावातील अनेक घरांमध्ये पाणी शिरून ग्रामस्थांचे नुकसान झाले आहे. तर वडखळ, गडब, आमटेम परिसरातील शेतामध्ये पुराचे पाणी शिरल्याने शेतीचे नुकसान झाले आहे.

Raigad
Mumbai Rain Alert : मुंबईला येलो अलर्ट! ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरीत पुढील तीन तासांत मुसळधार पावसाची शक्यता

मुसळधार पावसामुळे निडवली गावातील रोहिदास पांडू पवार व आघई येथील रामा चौधरी यांच्या घराचे नुकसान झाले.

महसूल विभागातर्फे नुकसानीचा पंचनामा करण्यात येणार आहे. खाडी किनाऱ्यावरील गावातील ग्रामस्थांना सतर्क राहावे तसेच व आवश्यकतेशिवाय घराबाहेर पडू नये.

- स्वप्नाली डोईफोडे, तहसीलदार, पेण

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.