Raigad News : लोकसभेसाठी रायगडवर भाजपचा दावा; धैर्यशील पाटील यांच्या नावाची चर्चा; पालीत पदाधिकाऱ्यांची इच्छा

रायगडचे राजकीय समीकरण पाच वर्षांत बदलले असून शिवसेना व राष्ट्रवादी पक्षात मोठी फूट पडली आहे. त्यामुळे रायगड लोकसभा मतदारसंघांमध्ये भाजप सर्वात प्रबळ पक्ष म्हणून प्रस्थापित झाला आहे.
raigad lok sabha election dhairyashil patil shiv sena ncp split politics
raigad lok sabha election dhairyashil patil shiv sena ncp split politicsSakal
Updated on

पाली : रायगडचे राजकीय समीकरण पाच वर्षांत बदलले असून शिवसेना व राष्ट्रवादी पक्षात मोठी फूट पडली आहे. त्यामुळे रायगड लोकसभा मतदारसंघांमध्ये भाजप सर्वात प्रबळ पक्ष म्हणून प्रस्थापित झाला आहे.

आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये रायगडचा उमेदवार हा भारतीय जनता पक्षाचा असेल. सर्वसामान्यांचे प्रश्न मांडणारा, जनतेच्या समस्यांसाठी लढणारा, संघर्ष करणारा नेता धैर्यशील पाटील हेच लोकसभेचे भावी उमेदवार असून त्यांचा विजय निश्चित असल्याची घोषणा भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर यांनी बुधवारी (ता.७) केली.

पालीमध्ये भाजपच्या वतीने कार्यकर्ता मेळावा आयोजित केला होता. या वेळी धैर्यशील पाटील म्हणाले की, संपूर्ण मतदारसंघ भाजपमय झाला आहे. रायगड लोकसभा मतदारसंघात एकट्या भाजपची ३ लाख २० हजार मते असल्याचा दावा त्यांनी केला.

रायगड जिल्ह्यासह खेड, दापोली, मंडणगड, गुहागर मध्येही राष्ट्रवादीचे दोन गट झाल्याने राष्ट्रवादीची ताकद कमी झाली आहे. जिल्ह्यात तिसरी मुंबई होत असून या विकासात सर्वसामान्यांना सामावून घेण्यासाठी नेते, कार्यकर्त्यांनी माझ्या नावाची शिफारस वरिष्ठांकडे केली आहे.

पेण-सुधागडमधून ८० हजार मतांची आघाडी देणार

आमदार रवींद्र पाटील यांनी आगामी लोकसभा निवडणुकीत धैर्यशील पाटील यांना पेण मतदारसंघातून ८० हजार मतांची आघाडी देण्याची घोषणा केली. तसेच विरोधी पक्षाकडे विकासाचा चेहरा नसल्‍याची टीका केली. घराघरांत नळाद्वारे पाणीपुरवठ्यासाठी सरकारने कोट्यवधी रुपयांचा निधी दिला आहे.

‘सुनील तटकरेंनी उमेदवारी सोडावी’

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सुनील तटकरे हे सध्या रायगड लोकसभा मतदारसंघाचे खासदार आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे असून आगामी निवडणुकांमध्ये महायुतीचे उमेदवार निवडून आणण्याकरिता प्रदेशाध्यक्ष बावनकुळे कुठेही उमेदवारी करणार नसल्याचे घोषित केले आहे. त्याचप्रमाणे सुनील तटकरेंनी आगामी निवडणुकांमध्ये उमेदवारी न करता राज्यात लक्ष घालून जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्न करावे, असे धैर्यशील पाटील म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.