रायगड जिल्ह्यातील इर्शाळवाडी इथं दरड कोसळल्यानं संपूर्ण गावच गाडलं गेलं आहे. यामध्ये अद्यापही जवळपास १०० हून अधिक लोक ढिगाऱ्याखाली अडकून पडले आहेत. मुसळधार पाऊस आणि चिखल यामुळं या बचाव कार्यात अनेक अडचणी येत आहेत. त्यासाठी प्रशासनानं आता श्वान पथकाची मदत घेतली आहे. (Raigad Maharashtra Canine squad carried out search operation in landslide hit area)
एनडीआरएफच्या माहितीनुसार, आम्ही आता आमच्या श्वान पथकाच्या मदतीनं शोध आणि बचाव कार्य सुरु केलं आहे. या मोहिमेत या पथकातील एका श्वानानं ढिगाऱ्याखालून दोन मृतदेह शोधून काढले आहेत. (Latest Marathi News)
आम्हाला बचाव कार्य राबवताना इथं अनेक आव्हानांचा सामना करावा लागतो आहे. डोंगराळ निसरडा भाग, चिखल आणि मुसळधार पाऊस यामुळं आम्हाला आमच्या अत्याधुनिक यंत्रणा दुर्घटनास्थळी आणता येत नाहीएत. त्यामुळं श्वान पथकाला पाचारण करण्यात आलं आहे. (Marathi Tajya Batmya)
एनडीआरएफच्या जवानानं सांगितलं की, "श्वान पथकातील 'फिरो' नावाच्या एका श्वानानं आज दोन मृतदेह शोधून काढले. तर मारिया आणि जॉकी हो आणखी दोन श्वान आम्हाला या बचाव मोहिमत मदत करत आहेत. डोंगरावर बचाव कार्य राबवताना मोठ्या अडचणी येत आहेत तिथं आम्हाला आमची आधुनिक उपकरण नेता येत नाहीएत."
दरम्यान, रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील इर्शाळवाडी इथं बुधवारी रात्रीच्या सुमारास दरड कोसळली. यामध्ये सुमारे ५० घरांवर डोंगर कोसळल्यानं ती मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडली गेली.
गुरुवारी पहाटेपासून अद्यापर्यंत दोन दिवस इथं एनडीआरएफ, एसडीआरएफ आणि अग्निशमन दलाच्या मदतीनं शोध मोहिम राबवली जात आहे.
या भीषण दुर्घटनेत आत्तापर्यंत २० जणांचा मृत्यू झाला आहे तर १०३ हून अधिक लोकांना बाहेर काढण्यात यश आलं आहे, अद्यापही जवळपास १५० लोक ढिगाऱ्याखाली अडकल्याचं सांगतलं जात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.