Raigad : एनडीआरएफचा तळ, महाडमध्ये आपत्‍कालीन यंत्रणा सज्‍ज

रायगड जिल्ह्यामध्ये तीन जून २०२० मध्ये निसर्ग चक्रीवादळ आले. त्यानंतर २०२१ मध्ये जुलै महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीमध्ये महाडसह अनेक भागात पूर आला.
Raigad
RaigadSakal
Updated on

Raigad - जिल्ह्यात १५ जुलैनंतर पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. आपत्‍कालीन परिस्‍थितीत बचाव कार्यासाठी पुणे येथून एनडीआरएफ पथक रायगड जिल्ह्यात दाखल होणार असून महाडमध्ये तळ ठोकणार असल्‍याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.

रायगड जिल्ह्यामध्ये तीन जून २०२० मध्ये निसर्ग चक्रीवादळ आले. त्यानंतर २०२१ मध्ये जुलै महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीमध्ये महाडसह अनेक भागात पूर आला. तळिये गाव दरडीखाली गाडले गेले.

Raigad
Mumbai Crime : कसारा स्थानकातून सराईत दरोडेखोराला अटक, एक चाकू व मोबाईल हस्तगत करण्यात आला

जिल्ह्यात २४ जूनपासून पावसाला सुरुवात झाली आहे. पावसामध्ये आतापर्यंत २६ पेक्षा अधिक घरांची पडझड झाली असून महाड, पेण, मुरूड परिसरात दरड कोसळण्याच्या घटना घडल्‍या आहेत. जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापासून पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.

या कालावधीत जीवित व वित्तहानीचा धोका नाकारता येत नाही. त्यापार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने दोन ते तीन वर्षांत झालेल्या दुर्घटनेतून बोध घेत एनडीआरएफ दलाला पाचारण केले आहे.

महाड शहरातील नागरिकांना दरवर्षी पूरपरिस्थितीला तोंड द्यावे लागते. या आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी महाड नगरपालिका सज्ज असून नगरपालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकातील प्रशासकीय भवनातील तिसऱ्या मजल्यावर चौवीस तास आपत्ती नियंत्रण कक्ष कार्यरत करण्यात आला आहे.

Raigad
Mumbai Local : दंडाच्या नावाखाली रेल्वे प्रवाशाकडून साडेचार हजाराची वसुली! मात्र, दंडाची पावती नाही

सावित्री व गांधारी नदीच्या काठावर महाड शहर वसले असून अतिवृष्टी झाल्यानंतर शहराला दरवर्षी पुराचा तडाखा बसतो. २०२१ मध्ये महाडमध्ये आलेल्‍या पुरात मोठी हानी झाली होती. या पार्श्वभूमीवर पूरपरिस्थितीत पूर्वसूचना देण्यापासून ते आपत्ती नियंत्रणासाठी आवश्यक उपाययोजना समाविष्ट असणारा कृती आराखडा पालिकेने तयार केला आहे.

आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत पालिकेच्या माहिती तंत्रज्ञान विभागाकडून हवामान व पावसाचा अंदाज, भरती-ओहोटीची स्थिती व पूरपरिस्थितीबाबत नागरिकांना सूचना देण्याची सुविधा केली आहे. १५ जुलैपासून एनडीआरएफ पथकही महाडमध्ये तैनात राहणार असून २५ जवानांच्या तुकडीचा समावेश आहे.

Raigad
Mumbai News : 'भाजपा का साथ गद्दर के साथ' म्हणणं भोवलं! पोस्टर झळकावल्याने मुंबईत गुन्हा दाखल

पालिकेचा कृती आराखडा तयार

पूरस्‍थितीच्या पूर्वसूचनेसाठी नियंत्रण कक्ष कार्यान्वित

बचाव पथकाचे तीन विभाग

आपत्कालिन स्थितीत बचावकार्यासाठी पूर्व, मध्य व पश्चिम असे तीन विभाग करण्यात आले आहेत. याशिवाय बचाव स्थानके असून प्रत्येकी एका बोट, बोटमन, दोन जीवरक्षक व इतर स्वयंसेवी संघटनांचे मदतनीस तैनात आहेत. अत्यावश्यक मदतकार्यासाठी ३४ प्रकारची विविध साहित्य उपलब्ध आहेत. पूरस्थितीत आवश्यकता भासल्यास नागरिकांना स्थलांतरित करायची ठिकाणे व तेथील व्यवस्था याबाबत नियोजन झाले आहे.

Raigad
Mumbai Crime : कसारा स्थानकातून सराईत दरोडेखोराला अटक, एक चाकू व मोबाईल हस्तगत करण्यात आला

महाबळेश्वरमधील पावसाकडे लक्ष

सावित्री नदीचे उगमस्थान महाबळेश्वर आहे. महाबळेश्‍वर उंचावर असल्याने पावसाचे पाणी झपाट्याने खाली येते. त्यामुळे येथील पावसावरही महाडमधील पूरस्थिती अवलंबून असते. स्थानिक पर्जन्यमान, ग्रामीण भागातील पाऊस व महाबळेश्वरचा पाऊस याच्या विशेष नोंदी ठेवल्या जाणार असून महाबळेश्वर व महाड पालिका यांचा समन्वयही राहणार आहे.

आपत्कालीन स्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी महाड पालिकेत चोवीस तास आपत्ती नियंत्रण कक्ष कार्यान्वित केला आहे. आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी प्रशासनाने सर्व तयारी पूर्ण केलेली आहे.

- महादेव रोडगे, मुख्याधिकारी, महाड

मान्सूनचा अंदाज घेत १५ जुलैपासून एनडीआरएफचे दल रायगड जिल्ह्यात महाडमध्ये दाखल होणार आहे. पथकाकडून आपत्‍कालीन परिस्‍थितीवर लक्ष ठेवण्यात येणार आहे.

- सागर पाठक, अधिकारी, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.