Raigad News : भरत गोगावलेंना पुन्हा पालकमंत्रिपदाची हुलकावणी ; मंत्रिमंडळाच्या तिसऱ्या विस्‍तारात अपेक्षापूर्तीची शक्‍यता

नवरात्रोत्सवानंतर मंत्रिमंडळाचा तिसऱ्यांदा विस्तार होणार असल्याने, दुर्गामातेची कृपा झाल्यास नक्की मंत्रिपद मिळेल,
bhart gogawale
bhart gogawale sakal
Updated on

अलिबाग - रायगडचे पालकमंत्रिपद मिळावे म्हणून चार वर्षांपासून प्रतीक्षेत असलेले महाडचे आमदार भरत गोगावले यांचे पालकमंत्रिपद पुन्हा हुकले. बुधवारी राज्यातील १२ जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांच्या जाहीर केलेल्या सुधारित यादीतही भरत गोगावले यांना स्थान मिळाले नाही. महायुतीत असलेल्या सरकारमध्ये रायगडच्या पालकमंत्रिपदासाठी दोन नावे स्पर्धेत आहेत. यातील एकाला मंत्रिपद दिल्यास दुसरा गट नाराज होणार असल्याने सध्या तरी दोन्ही नावे बाजूला ठेवण्यात आली आहेत.

नवरात्रोत्सवानंतर मंत्रिमंडळाचा तिसऱ्यांदा विस्तार होणार असल्याने, दुर्गामातेची कृपा झाल्यास नक्की मंत्रिपद मिळेल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली. राज्यातील १२ जिल्ह्यांच्या पालकमंत्रिपदाची यादी जाहीर झाली असली, तरी रायगडच्या पालकमंत्रिपदावरून शिंदे गट आणि अजित पवार गटात सर्वाधिक संघर्ष पाहायला मिळाला, त्‍यामुळे सध्या तरी याबाबत

निर्णय घेण्यात आलेला नाही.

रायगडच्या पालकमंत्रिपदाचा अतिरिक्त भार रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडेच आहे. याबाबत भरत गोगावले म्हणाले की, सध्या रायगडचे पालकमंत्रिपद उदय सामंत यांच्याकडे आहे. ते आमच्याच पक्षाचे असल्याने खऱ्या अर्थाने पद आमच्याकडेच आहे. मात्र आपली पालकमंत्रिपदासाठीची आस थांबलेली नाही. याबाबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री योग्य निर्णय घेतील, असे त्‍यांनी नमूद केले.

bhart gogawale
Chh. Sambhaji Nagar : स्वच्छतागृहात लावले खासदार हेमंत पाटील यांचे पोस्टर, ठाकरे गटाचे आक्रमक आंदोलन

पहिली निवडणूक अपक्ष म्‍हणून

१९९२ मध्ये पंचायत समिती निवडणूक लढण्यासाठी गोगावलेंनी काँग्रेसकडे तिकीट मागितले होते, मात्र तिकीट न मिळाल्‍याने ते अपक्ष म्‍हणून लढले आणि जिंकले. त्यानंतर त्‍यांनी शिवसेनेत प्रवेश केला. तेव्हापासून म्हणजे १९९२-९३ पासून ते शिवसेनेशी जोडले गेले असून सध्या शिंदे गटाशी एकनिष्‍ठ आहेत.

bhart gogawale
Yuva Sangharsh Yatra : रोहित पवार महाराष्ट्राचे राहुल गांधी होऊ पाहत आहेत का?

चार वर्षांपासून मोर्चेबांधणी

तिसऱ्यांदा आमदार झालेल्या भरत गोगावले यांना डावलून नवख्या राष्ट्रवादीच्या अदिती तटकरे यांना रायगडचे पालकमंत्रिपद देण्यात आले होते, तेव्हापासून गोगावले यांची पालकमंत्रिपदासाठी मोर्चेबांधणी सुरू आहे.

bhart gogawale
Sangli News : १९ गावांच्या पाणी प्रश्नासाठी सुमनताई पाटील आणि रोहित पाटील यांचे उपोषण 'ह्या' आहेत मागण्या

एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर महाविकास आघाडीचे मंत्रिमंडळ बरखास्त झाले; अन् नव्याने मंत्रिमंडळ स्थापन केले. एकनाथ शिंदे आणि भाजप सरकारने पहिल्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्तारात गोगावलेंना संधी मिळाली नाही. दुसऱ्या मंत्रिमंडळ विस्तारात संधी दिली जाईल, असे आश्वासन देऊन शांत करण्यात आले.

जूनमध्ये अजित पवारांनी राष्ट्रवादीत बंड करून सरकारला पाठिंबा दिला. त्यांच्यासोबत आलेल्या आठ आमदारांसह दुसऱ्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्तार झाला. यातही गोगावलेंची वर्णी लागली नाही; परंतु मंत्रिमंडळात नक्की स्थान देतील, असा विश्वास त्‍यांना आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.