Raigad News : सुधागडात भाजपचे कमळ बहरले; 13 पैकी 6 एकहाती भाजपचे तर दोन ठिकाणी भाजप युतीचे सरपंच

परळीत शिवसेना शिंदे गटाने दिला महापरिवर्तन आघाडीला झटका
raigad
raigadsakal
Updated on

पाली - सुधागड तालुक्यात ग्रामपंचायतीच्या निवडणुकांचे निकाल सोमवारी (ता.6) जाहीर झाले. या निवडणुकीत तालुक्यात भाजपने मुसंडी मारली असून 13 पैकी 6 एकहाती भाजपचे तर दोन ठिकाणी भाजप युतीचे सरपंच निवडून आले आहेत. परळीत बाळासाहेब ठाकरे शिवसेनेने (शिंदे गट) महापरिवर्तन आघाडीला झटका दिला आहे. तर रासळमध्ये ग्रामविकास आघाडी सरस ठरली आहे. पाली तहसील कार्यालयात मतमोजणीची प्रक्रिया पार पडली. सकाळपासूनच मतमोजणी केंद्राबाहेर उमेदवार, कार्यकर्ते व नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. निवडणुकीचा निकाल जसा जाहीर होत होता तसतसे जिंकलेले उमेदवार त्यांचे कार्यकर्ते प्रचंड जल्लोष करून गुलालाची उधळण करत होते.

विजयी सरपंच

नाड्सुर - खंडागळे श्याम बाळू = शेकाप - भाजपा - उबाठा

नवघर - माई सुधीर चव्हाण = उबाठा - वंचित

कळंब - प्रणिता राकेश मानकर = भाजपा

भार्जे - चिंतामण बाबू सुतार = भाजपा

नांदगाव - आशिष बालाजी सावंत = शेकाप - राष्ट्रवादी

वऱ्हाड जांभूळपाडा - पांडुरंग लिंबाजी शेंडे = उबाठा - भाजपा

पाच्छापुर - उत्कर्षा रोशन बेलोसे = शेकाप

रासळ - प्रणिता प्रवीण खाडे = ग्रामविकास आघाडी

परळी - साक्षी सतीश देसाई = शिवसेना शिंदे गट - शेकाप

राबगाव - स्नेहा संदेश भोईर = भाजपा

दहिगाव - विष्णू नवश्या वाघमारे = भाजपा

गोमाशी - मंगला रघुनाथ जाधव = भाजपा

महागाव - दीपिका विजय सुतार = भाजपा

तीन ग्रामपंचायत सरपंच बिनविरोध

गोमाशी, महागाव व दहीगाव या ग्रामपंचायत मधून सरपंच पदासाठी एकच अर्ज दाखल झाला असल्याने या तिन्ही ग्रामपंचायतीचे सरपंच हे बिनविरोध झाले होते. त्याचबरोबर महागाव ग्रामपंचायतमध्ये सदस्य देखील बिनविरोध झाले असल्याने महागाव ग्रामपंचायत पूर्णपणे बिनविरोध झाली.

अनोख्या आघाड्या व युती

राज्यात उबाठा व भाजपमध्ये कट्टर वैर असले तरी ग्रामपंचायत निवडणुकीत मात्र दोन्ही पक्ष एकत्र येऊन लढलेले दिसले. यामध्ये नाडसुर व वऱ्हाड-जांभूळपाडा येथे सरपंच या युतीचे सरपंच निवडून आले. नांदगाव मध्ये शेकाप राष्ट्रवादी काँग्रेस व परळीमध्ये बाळासाहेब ठाकरे शिवसेना (शिंदे गट) व शेकापचा सरपंच निवडून आला. रासळमध्ये ग्रामविकास आघाडीचे सरपंच आले. अशाप्रकारे अनोख्या आघाड्या व युती पहायला मिळाल्या.

raigad
Maratha Reservation: मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात ‘कुणबी’ पुराव्यांबाबत शोध मोहीम झाली सुरु!

रासळ मध्ये प्रस्थापितांना धक्का

तालुक्यातील श्रीमंत असलेल्या रासळ ग्रामपंचायतमध्ये प्रतिष्ठेच्या लढतीत ग्रामविकास आघाडीने प्रस्थापितांना धक्का दिला व सरपंच पदी प्रणिता प्रवीण खाडे तब्बल 316 मतांनी निवडून आल्या आहेत.

परळीत बाळासाहेब ठाकरे शिवसेनेची (शिंदे गट) दमदार बाजी

सुधागड तालुक्यातील अत्यंत महत्वाची व प्रतिष्ठेची मानल्या जाणा-या परळी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत परिवर्तन विकास महाआघाडी उतरली होती. विशेष म्हणजे या महाआघाडीत शिवसेना बाळासाहेब ठाकरे (शिंदे गट) सोडून सर्व पक्ष एकत्र होते. सदरची लढत भाजप, रिपाइं, वंचित, शिवसेना (उबाठा), राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध शिवसेना बाळासाहेब ठाकरे (शिंदे गट) अशी असल्याने ही निवडणूक चुरशीची झाली. यामध्ये बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या (शिंदे गट) साक्षी सतीश देसाई यांनी बाजी मारत यश प्राप्त केले. त्या 181 मतांनी निवडून आल्या.

raigad
Maratha Reservation: सामाजिक सलोखा बिघडेल, मराठ्यांना वेगळंच आरक्षण द्या; मराठा समाजाकडून मुख्यमंत्र्यांना घेराव

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार रवींद्र पाटील, दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटील, भाजप नेत्या गीता पालरेचा, सुधागड तालुका अध्यक्ष श्रीकांत ठोंबरे व युवा मोर्चा अध्यक्ष रोहन दगडे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांनी अथक मेहनत घेतली आहे. भाजपच्या तळागाळात काम करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांचे व संघटनेचे हे यश आहे. लोकांचा विश्वास कायम ठेवून सर्वागीण विकासाच्या दृष्टीने पावले उचलली जातील.

राजेश मपारा, भाजप, महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सदस्य

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.