Raigad News : रोह्यातील आरोग्‍य सेवाच आजारी; उपजिल्हा रुग्णालयातील कारभार प्रभारी, कंत्राटींच्या हाती

अपघात किंवा दुखापत झालेला रुग्ण प्रथोमोपचारासाठी आल्यावर त्याची गैरसोय होते.
raigad
raigad roha
Updated on

रोहा - तालुक्यातील उपजिल्हा रुग्णालयात डॉक्टरांची आठ पदे मंजूर आहेत. त्‍यापैकी केवळ तीन पदे भरली असून पाच पदांवर कंत्राटी पद्धतीने नियुक्‍ती करण्यात आली आहे. या पाचपैकी एका डॉक्‍टरवर माणगावचा अतिरिक्‍त भार आहे. दुर्गम, ग्रामीण भाग अधिक असल्‍याने उपजिल्‍हा रुग्‍णालयात येणाऱ्या बाह्य रुग्‍णांची संख्याही मोठी आहे. अपुऱ्या मनुष्‍यबळामुळे रुग्‍णसेवेवर परिणाम होत असल्‍याने सहायक अधीक्षक, तज्‍ज्ञ डॉक्टरांसह ज्युनियर लिपिक आणि चतुर्थ श्रेणीतील कर्मचाऱ्याची कायमस्‍वरूपी नियुक्‍ती करण्याची मागणी होत आहे.

अपघात विभागात वरणोपचारक (ड्रेसर) हे पद रिक्त असल्याने इतरांना जबाबदारी पार पाडावी लागते. अपघात किंवा दुखापत झालेला रुग्ण प्रथोमोपचारासाठी आल्यावर त्याची गैरसोय होते. धाटाव एमआयडीसीमधील कंपन्यांनी आणि रोहेकर नागरिकांनी रुग्णांना चांगल्‍या सोयी-सुविधा मिळाव्यात म्‍हणून उपजिल्हा रुग्णालयात ऑक्सिजन मशिन्स दिल्‍या आहेत, मात्र तज्‍ज्ञ डॉक्टर्स उपलब्ध नसल्याने मशिन्स वापराविना पडून आहेत. उपजिल्हा रुग्णालयात तीन आठवड्यांपासून लहान मुलांचे औषधांचे डोस उपलब्ध नाहीत. त्‍यामुळे लसीकरणासही विलंब होत आहे.

प्राथमिक आरोग्‍य केंद्रातील १३ जागा रिक्‍त

रोहा तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रातील मंजूर ४६ जागांपैकी १३ जागा रिक्त आहेत. परिणामी आरोग्यसेवेवर परिणाम होत आहे. नागरिकांना वेळेवर उपचार मिळण्यात अडचणी येत आहेत, तर उपलब्ध डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांवर कामाचा अतिरिक्त ताण येत आहे. तालुक्यात तीन प्राथमिक आरोग्‍य केंद्र असून कोकबनमध्ये ५, आंबेवाडी केंद्रात १, नागोठणेमध्ये ७ जागा रिक्त आहेत.

raigad
Raigad News : वाचन प्रेरणा दिन विशेष; फुल पुष्पगुच्छ ऐवजी पुस्तकांची भेट

तीनही केंद्रास सद्यस्‍थितीत पुरेसा औषधसाठा असून त्याची तपासणी नुकतीच तालुका आरोग्य अधिकाऱ्यांकडून करण्यात आली आहे. महामार्गावरील नागोठणे प्राथमिक आरोग्य केंद्रात १०८ रुग्‍णवाहिका नाही. हे आरोग्‍य केंद्र मुंबई-गोवा महामार्गालगत आहे. एखादा अपघात झाल्‍यास रुग्णांना याठिकाणी प्रथमोपचारासाठी आणले जाते.

परंतु या केंद्रात १६ पैकी ७ जागा रिक्त आहेत. शिवाय नागोठणेसाठी १०८ रुग्‍णवाहिका उपलब्ध नसल्याने तातडीच्या उपचार मिळताना मोठी गैरसोय होते. कोलाड येथे काही दिवसांपूर्वी झालेल्‍या अपघातात एक चिमुरडीला जखमी झाली होती. यावेळी १०८ रुग्‍णवाहिका चालक स्वप्नील बाकाडे यांच्याकडून त्‍वरित प्रतिसाद मिळाल्‍याने चिमुरडीला त्‍वरित अलिबाग जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आल्‍याने तिचे प्राण वाचले. बोलावले जाते), अधिपरिचारिका-२, कक्षसेवक-२, शस्‍त्रक्रिया परिचर-१, वरणोपचारक-१, शिपाई-१ आदी रिक्त पदे भरण्याची उपजिल्हा रुग्णालयात गरजेचे आहे. उपजिल्हा रुग्णालयातील रिक्त पदांसंदर्भात अहवाल आणि मागणीपत्र आरोग्य विभागाकडे दिले आहे.

raigad
Nashik ZP News: अखर्चित निधी वेळेत जमा केल्याचा जि. पला फटका; जमा न करणाऱ्या जिल्हा परिषदांना मिळाली मुदतवाढ

अतिरिक्‍त कार्यभार असलात तरी आठवड्यातून तीन दिवस उपस्‍थित असतो. एन.के. राहिरे, प्रभारी सहायक अधिक्षक, उपजिल्हा रुग्णालय, रोहा तज्‍ज्ञ डॉक्टर्स उपलब्ध नसल्याने ग्रामीण भागातील रुग्‍णांची गैरसोय होते. त्‍यामुळे लवकरात लवकर डॉक्टर्सची पदे कायमस्वरूपी भरावीत. किमान चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या नियुक्‍त्‍या तातडीने करण्यात याव्यात. नितीन परब, अध्यक्ष, सिटीझन फोरम रोहा तालुक्यातील तीनही प्राथमिक आरोग्य केंद्रातील रिक्त पदांबाबत लेखी अहवाल आणि मागणीपत्र जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडे आणि पंचायत समितीच्या गट विकास अधिकाऱ्यांकडे दिले आहे. वरिष्‍ठ पातळीवर निर्णय झाल्‍यास भरती प्रक्रिया सुरू होईल. अधिकाधिक चांगली सेवा देण्याचा प्रयत्‍न आहे. आदित्य शिरसाठ, तालुका आरोग्य अधिकारी, रोहा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.