महाड - सेवानिवृत्त एसटी कर्मचाऱ्याने आयुष्यभराची पुंजी म्हणून जमवलेल्या साडेसात लाखांची मुदत ठेव काढली होती. त्यावर परस्पर ऑनलाइन कर्ज काढून सात लाख ४५ हजारांचा गंडा घातल्याचा प्रकार महाड स्टेट बँकेच्या शाखेत घडला आहे. याप्रकरणी शाखा व्यवस्थापकाने हात वर केल्याने बँकेच्या कारभाराबाबत ग्राहकांमध्ये घबराट पसरली आहे.
वराठी गावातील प्रभाकर गोठल गतवर्षी एसटी चालक म्हणून सेवानिवृत्त झाले. सेवानिवृत्तीनंतर मिळालेले १४ लाख रुपये त्यांनी महाड स्टेट बँकेत २६ ऑगस्ट २०२२ ला एक वर्षाच्या मुदत ठेव योजनेंतर्गत ठेवले. मुदत संपत आल्याने बँकेकडून त्यांना मुदत ठेवीच्या नूतनीकरणाचा मेसेज आला. त्यांनी बँकेत चौकशी केली असता, फसवणुकीचा प्रकार उघडकीस आला.
गोठल यांच्या मुदत ठेवीच्या रकमेवर २८ डिसेंबर २०२२ ला एक लाख ३० हजार रुपये, दोन लाख ४५ हजार, व तीन लाख ७० हजार असे एकूण सात लाख ४५ हजारांचे कर्ज ऑनलाईन काढण्यात आल्याची नोंद आहे, मात्र त्यांनी कोणतेही कर्ज घेतले नव्हते.
याबाबत बँकेच्या शाखा व्यवस्थापकाकडे त्यांनी तक्रार केली असून मुदत ठेव परत मिळावी, अशी मागणी केली आहे. खाते तपासणीनंतर त्यांच्या खात्यातील रक्कम दिल्लीच्या फेडरल बँकेत अन्य एका व्यक्तीच्या नावे ट्रान्स्फर झाल्याचे दिसते.
महाड शहर पोलिस ठाण्यात तक्रार
महाड स्टेट बँकेच्या शाखेत महाड तालुक्यातील सेवानिवृत्त झालेल्या हजारो कर्मचाऱ्यांच्या तसेच भारतीय सैन्यातून निवृत्त झालेल्या हजारो कर्मचाऱ्यांच्या मुदत ठेवी आहेत.
गोठल यांना न्याय मिळाला नाही तर या ठेवी काढण्याची तयारी सेवानिवृत्त शिक्षक व सैनिकांनी केली आहे. याबाबत प्रभाकर शंकर गोठल यांनी महाड शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.