Raigad : चुकीचे लसीकरण करणाऱ्या तीन कर्मचाऱ्यांचे निलंबन

जिते केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्यांवरही टांगती तलवार
Raigad
Raigad esakal
Updated on

अलिबाग - बालकांचे चुकीचे लसीकरण करणाऱ्या जिते प्राथमिक आरोग्य केंद्रातील २ आरोग्य सहायक व एक आरोग्य सेवक यांना सेवेतून निलंबित करण्यात आले आहे.

सर्पदंश झालेल्या १२ वर्षीय मुलीला वेळेत प्राथमिक उपचार न मिळाल्याने तिचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. त्याचबरोबर स्थानिकांनी केलेल्या आंदोलनानंतर जिल्हा परिषदेने कारवाई करत तीन आरोग्य कर्मचाऱ्यांना निलंबित केले.

Raigad
Pune Dam Water Level : पानशेत धरण ९१, तर वरसगाव ८२ टक्के भरले

१ मे रोजी जिते प्राथमिक आरोग्य केंद्रात ५ बालकांना गोवर रुबेला लस देणे आवश्यक असताना त्यांना आरोग्य कर्मचाऱ्यांनी बी.सी.जी. लस दिली होती. त्‍यामुळे बालकांच्या शरीरावर व्रण उठल्‍याने त्रास सहन करावा लागला होता.

या प्रकरणाची चौकशी आरोग्य विभागाकडून करण्यात आली. याप्रकरणी आरोग्य सहायक विकास पाटील, आरोग्य सहायक प्रियांका म्हात्रे, आरोग्य सेवक कोमल पाटील यांच्याकडून कर्तव्यात कसूर झाल्याचे निष्पन्न झाल्‍याने त्‍यांना निलंबित केले आहे.

Raigad
Raigad : माथेरानच्या गारबटवाडीतील डोंगर खचला,जमिनीला भेगा; नगरपरिषदेच्या कम्‍युनिटी सेंटरमध्ये नागरिकांचे स्‍थलांतर

पेण जिते येथील सारा ठाकूर या १२ वर्षीय मुलीला मण्यार जातीचा सापाने दंश केल्याची घटना २६ जुलै रोजी घडली होती. या प्रकरणात प्राथमिक उपचार न मिळाल्याने साराचा मृत्यू झाल्याचा आरोप तिच्या नातेवाइकांनी केला आहे.

या प्रकरणाची आरोग्य विभागाकडून चौकशी करण्यात आली असून, घटनेच्या दिवशी जिते प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी मिलिंद पाटील हे आरोग्य केंद्रात हजर नसल्याचे समोर आले आहे. तसेच मे महिन्यात चुकीचे लसीकरण झाले,

Raigad
Mumbai News: धक्कादायक! बोरीवलीतील सोसायटीच्या फ्लॅटमध्ये कुजलल्या अवस्थेत आढळला महिलेचा मृतदेह

या प्रकरणातही पाटील यांनी क्षेत्रीय कामाचे व्यवस्थितरीत्या पर्यवेक्षण केले नसल्याने निष्पन्न झाले. यामुळे डॉ. मिलिंद पाटील यांच्या निलंबित करण्याचा प्रस्ताव राष्ट्रीय आरोग्य अभियानचे आरोग्य सेवा संचालक आयुक्त यांच्याकडे सादर करण्यात आला आहे.

वैद्यकीय अधिकाऱ्यांनी प्राथमिक आरोग्य केंद्रात उपस्थित असणे आवश्‍यक आहे. यापुढे प्राथमिक आरोग्य केंद्रांना अचानक भेटी देणार असून, जे वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित नसतील त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. तसेच बालकांचे लसीकरण करण्यापूर्वी सर्व वैद्यकीय अधिकारी यांनी संबंधित आरोग्य कर्मचाऱ्यांना योग्‍य प्रशिक्षण द्यावे.

- डॉ. भरत बास्टेवाड, मुख्य कार्यकारी अधिकारी, रायगड जिल्हा परिषद

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.