श्रीवर्धन, ता. (बातमीदार) : तालुक्यातील हरिहरेश्वर येथे राहण्यासाठी रूम न देण्याच्या कारणावरुन पुण्याच्या पर्यटकांनी महिला चिरडल्याची धक्कादायक घटना शनिवारी (ता. 19) रात्री दीड च्या सुमारास घडली. या प्रकरणातील महिलेचा जागीच अंत झाला आहे. एकाळा स्थानिकांनी पकडले तर उतर पर्यटकांचा पोलीस शोध घेत आहेत.
याबाबतीत सविस्तर माहिती अशी कि, पुणे येथील अकरा पर्यटक एक स्कार्पिओ भरून यावेळी हरिहरेश्वर येथील अभि धामणस्कर यांच्या ममता होम स्टे येथे राहण्याच्या चौकशीसाठी आले होते. हे सर्व पर्यटक अत्यंत मद्यधुंद अवस्थेत होते.