Konkan Railway: उत्तरकाशीमधील अपघातानंतर कोकण रेल्वे अलर्टवर, बोगद्यांच्या  सुरक्षिततेसाठी घेतला मोठा निर्णय!  

Konkan Railway: उत्तरकाशीमधील अपघातानंतर कोकण रेल्वे अलर्टवर, बोगद्यांच्या सुरक्षिततेसाठी घेतला मोठा निर्णय!  

Published on

Konkan Railway: उत्तराखंडमधील बोगद्याचे काम कोसळल्‍याने ४१ मजूर अडकले होते. त्‍यामुळे बोगद्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे. यातून मार्ग काढण्यासाठी आता महामार्गावरील बोगद्यांच्या कामात कोकण रेल्‍वे सहकार्य करणार आहे. तसा सामंजस्य करार राष्‍ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि कोकण रेल्‍वे कॉर्पोरेशन यांच्यात झाला.


या करारांतर्गत, कोकण रेल्वे महामंडळ हे राष्‍ट्रीय महामार्ग विभागाच्या प्रकल्पांना सेवा प्रदान करणार आहे. ज्यामध्ये बोगदा बांधकाम आणि उतार स्थिरीकरणाशी संबंधित डिझाइन, रेखाचित्र आणि सुरक्षा पैलूंचा सर्वसमावेशक आढावा समाविष्ट आहे. याखेरीज कोकण रेल्‍वे बोगद्यांची सुरक्षा तपासणी देखील करणार असून, आवश्यक भासल्यास, उपचारात्मक उपाय सुचविणार आहे. या व्यतिरिक्त कोकण रेल्‍वे आता महामार्ग अधिकाऱ्यांच्या क्षमता वाढीसाठी प्रशिक्षण कार्यक्रम देखील घेणार आहे.

Konkan Railway: उत्तरकाशीमधील अपघातानंतर कोकण रेल्वे अलर्टवर, बोगद्यांच्या  सुरक्षिततेसाठी घेतला मोठा निर्णय!  
Diwali Special Railway: स्पेशल, दिवाळी उत्सव रेल्वेमुळे प्रवाशांना दिलासा! नाशिक रोड रेल्वेस्थानकात गर्दी

उत्तराखंडमध्ये बोगद्याचे बांधकाम कोसळल्याने ४१ मजूर अडकल्याच्या घटनेनंतर महामार्ग विभागाकडून बांधल्‍या जाणाऱ्या बोगद्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर आला. बोगद्यात अडकलेल्‍या सर्व कामगारांना बाहेर काढण्यात यश आले असले, तरी यापुढे भविष्यात अशी दुर्घटना घडू नये म्हणून सावध भूमिका घेत राष्‍ट्रीय महामार्ग विभागाने देशातील सर्व बोगद्यांच्या कामाचे सेफ्टी ऑडिट करण्याचा निर्णय घेतला. या कामासाठी कोकण रेल्वे महामंडळाशी सामंजस्य करार केला आहे

. त्‍यामुळे कोकण रेल्‍वेच्या यशात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. आता महामार्गांवरील बोगद्यांच्या बांधकामादरम्यानची सुरक्षा आणि उच्च दर्जाच्या मानकांचे पालन सुनिश्चित करण्यासाठी कोकण रेल्‍वे देशभरातील सर्व २९ निर्माणाधीन बोगद्यांचे सेफ्टी ऑडिट, अर्थात सुरक्षा लेखा परीक्षण करणार आहे.

Konkan Railway: उत्तरकाशीमधील अपघातानंतर कोकण रेल्वे अलर्टवर, बोगद्यांच्या  सुरक्षिततेसाठी घेतला मोठा निर्णय!  
Diwali Special Railway: स्पेशल, दिवाळी उत्सव रेल्वेमुळे प्रवाशांना दिलासा! नाशिक रोड रेल्वेस्थानकात गर्दी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.