अवकाळी पावसामुळे तारांबळ 

rain konkan sindhudurg
rain konkan sindhudurg
Updated on

वेंगुर्ले (सिंधुदुर्ग) - तालुक्‍यातही आज पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. या अवकाळी पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. तालुक्‍यातील मातोंड, तुळस, होडावडा, वजराठ, आडेली तसेच बाजूच्या इतर भागात मोठ्या प्रमाणात पाऊस पडला. इतर भागात हलक्‍या सरी कोसळल्या. या अवकाळी पावसामुळे वातावरणात गारवा पसरला होता. यामुळे नुकत्याच मोहोर आलेल्या आंबा पिकाला फटका बसण्याची शक्‍यता असल्यामुळे बागायतदारांमधे चिंतेचे वातावरण पसरले आहे. सावंतवाडी तालुक्‍यातील तळवडे बाजारपेठेतही पावसामुळे पाणी साचले होते. 

कणकवलीत हलका 
कणकवली : कणकवली शहरासह तालुक्‍याच्या अनेक भागात आज दुपारी तीन ते चार या वेळेत पावसाच्या हलक्‍या सरी कोसळल्या. यात शहरातून जाणारा मुंबई गोवा महामार्ग निसरडा झाल्याने काही दुचाकीस्वारांना अपघाताला सामोरे जावे लागले. 
तालुक्‍यात आज सकाळपासून ढगाळ वातावरण होते तर दुपारी दोन पासून ढगांची दाटी झाली. तीन वाजल्यानंतर शहर आणि तालुक्‍यात रिमझिम सरींना सुरवात झाली. सायंकाळी चार वाजेपर्यंत हा पाऊस सुरू होता. या पावसामुळे चौपदरीकरणाचे काम सुरू असलेला मार्ग चिखलमय आणि निसरडा झाला होता. त्याचा अंदाज न आल्याने अनेक दुचाकीस्वार घसरले. 

बांदा परिसरातही सरी 
बांदा ः येथे आज सायंकाळी शहर व परिसरात अवकाळी पावसाच्या सरी कोसळल्या. 20 मिनिटे पडलेल्या पावसाने काजू मोहोरावर विपरीत परिणाम होणार असल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. आज दुपारीच वातावरण ढगाळ होते. त्यामुळे सायंकाळी पाऊस पडण्याची शक्‍यता निर्माण झाली होती. सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास अवकाळी पावसाला प्रारंभ झाला. दशक्रोशीत काजूचे सर्वाधिक उत्पादन शेतकरी घेतात. यावर्षी थंडीला लवकर प्रारंभ झाल्याने काजू कलमांना मोठ्या प्रमाणात मोहोर आला आहे. त्यामुळे यावर्षी काजूचे भरघोस उत्पन्न मिळण्याची शक्‍यता होती; मात्र आज कोसळलेल्या अवकाळी पावसाचा परिणाम मोहोरावर होण्याची शक्‍यता आहे. 

संपादन - राहुल पाटील

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.